🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत दोन मजली बांधकाम पाडून हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई साठी आमरण उपोषण


जा.क्र. महा. / छावा / १९९/२०२१/ श्रीरामपूर, जि. अहमदनगर हमदनगर, दि. २७/०९/२०२१, (२) जा.क्र. महा./ छावा / २६७/२०२१ / अहमदनगर, दि. १२/ अपर पोलीस अधीक्षक यांचे करीता ११/२०२१, (३) जा.क्र. महा./ छावा / २७१/ २०२१ / अहमदनगर, दि. ३०/११/२०२१, (४) जा.क्र. महा. / छावा / ९६४ / २०२२ / अहमदनगर, दि. २३/०३/२०२२. या पत्रान्वये दि. २७/ 110 JAN 2022 ०९/२०२१, ५) जा.क्र. महा./ छावा / १२३४/२०२२ / अहमदनगर, दि. २१/०६/२०२२ रोजी श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लोकसेवक गणेश शिंदे साहेब यांना संघटनेच्या वतीने हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत दोन मजली बांधकाम पाडून हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई करून  

गुन्हे दाखल करण्याची तक्रार केली होती.



तद्नंतर दि. २१/०६/२०२२ रोजी मा. विभागीय आयुक्त साहेब, नाशिक व मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांच्याकडे श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, बांधकाम अधिकारी, नगररचना अधिकारी, अतिक्रमण अधिकारी हे हॉटेल रुचिरावर जाणून-बुजून कारवाई करीत नसून त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असून त्यांच्या सर्व्हिस बुक वर लाल शेरा मारून या सर्वांना त्वरीत निलंबित करण्यात यावे. अशी विनंतीपर तक्रार केली होती. तद्नंतर मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांच्या नगरपालिका विभागाने क्र.नपा./कार्या- ४ / वशि./१४८०/२०२२ हे पत्र मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद व आम्हाला पत्र पाठविले आहे. त्यात श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, बांधकाम अधिकारी, नगररचना अधिकारी तसेच अतिक्रमण अधिकारी यांना हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याचे कारणापर खुलासा ७ दिवसात सादर करण्याचे आदेश केलेले असून त्यात नियमानुसार हॉटेल रुचिरावर कारवाई करण्याचे आदेश ही दिले होते.


तद्नंतर दि. ७ जुलै २०२२ रोजी श्रीरामपूर नगरपरिषदेने आम्हाला जा.क्र. वशि / ८२२०२२- २४९५ हे पत्र दिले त्यात हॉटेल रुचिराचे मालक यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांच्या न्यायालयात श्रीरामपूर नगरपरिषदे विरुद्ध दावा दाखल केलेला असून त्याचा नियमित दिवाणी दावा क्र. ९५/२०२२ असा आहे. त्या दाव्यात हॉटेल रुचिराच्या मालकाने अनाधिकृत बांधकामावर होणाऱ्या कारवाई वर मनाई हुकूम (स्टे ऑर्डर) मागितले होते पण मा. न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळला दि. १०/०८/२०२२ रोजी त्यांनी मागितलेला मनाई हुकूम कोर्टाने धुडकावून लावला. तरी ही श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन ही ते हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता दिसत नाही. त्यांना आम्ही अनेक वेळेस समक्ष भेटून सांगितले की, महाराष्ट्रात आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामावर नगरपरिषदा कारवाई करीत आहे. तर आपण कारवाई का करत नाही ?

आपल्या शेजारील तालुक्यात शिर्डी येथे ३ ते ४ मजल्याच्या अनाधिकृत हॉटेलच्या बांधकामावर शिर्डी नगरपंचायतीने कारवाई करुन ते अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. तर आपण या हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत बांधकामाला संरक्षण का देत आहेत ?
अगर न्यायालयाच्या मनाई हुकूम रद्द केल्यानंतर ही श्रीरामपूर नगरपरिषद हॉटेल रुचिराच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करत नसेल तर १५ दिवसानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता दि. ३०/०१/२०२३ रोजी पासून छावा स्वराज्य रक्षक सेनेच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर अमरण उपोषण करण्यात येत आहे. त्यात होणाऱ्या परिणामास प्रशासन, नगरपरिषद आणि हॉटेल रुचिराचे मालक सर्वस्वी जबाबदार राहतील अशी माहिती निवेदनात नमूद केली आहे

No comments:

Post a Comment

Comments system