एकलहरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून गुणवंतांचा गौरव
एकलहरे प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे संपूर्ण देशाची न्यायव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालू असून न्यायमंदिरावर आमचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. सदस्य शरद नवले, महसूल विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी मोहसीन राजमोहम्मद शेख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनंत परदेशी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, पत्रकार देविदास देसाई, राजेंद्र सातभाई आदींची भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना ॲड.
वाय. के. शेख यांची कन्या प्रथमवर्ग न्यायाधीश असिया शेख यांनी, मी एकलहरे गावाची भूमिपुत्र असून एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन न्यायाधीशापर्यंत पोहोचण्यामागे आई-वडील, नातेवाईक यांचा मोठा वाटा आहे. बेलापूर येथील शैलेश राजेंद्र सातभाई, वर्षाराणी शैलेश सातभाई, अभिषेक देविदास देसाई, अनिरुद्ध देविदास देसाई, प्रफुल प्रभाकर लोखंडे हे नुकतेच राज्य लोकसेवा मंडळाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महत्त्वाच्या पदावर कार्यरत झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी
सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी एकलहरे तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार जहागीरदार व पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच रमेश कोल्हे, सदस्या नसीमखातून जहागीरदार, अनुसया ठोंबरे, रावण निकम, आशा कांबळे, कोकिळा अग्रवाल, निर्मला झिने, पूजा चौधरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विलासराव ठोंबरे, अनिस शेख, रिजवान जहागीरदार, सादिक जहागीरदार, नूरअहेमद जहागीरदार, मन्सुर आभार मानले.
इमाम, मोहम्मद आझम, ताज पटेल, अकबर पटेल, मोहम्मद रोशन, इलाहीबक्ष शेख, सूर्यभान ताके, रहेमान फयाज, रहेमान दादामियाँ, प्रभाकर ताके, सुभाष शिंदे, ॲड. जोएब शेख, रुबिना शेख, अन्वर बिराम शेख, राजू वहाब, शफीक शेख, कामगार तलाठी इनामदार, ग्रामसेवक समीर मणियार, ग्रामपंचायत कर्मचारी विश्वास काळे, राजू कोहिले, राजू निकम, सद्दाम शेख, ब्राव्हन गव्हाणे, जलाल शेख, समीर शेख उपस्थित होते. नवाज जहागीरदार यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment