🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

संतोष मते व प्रसन्न धुमाळ यांना ‘उत्कृष्ट निवेदक’ पुरस्कार प्रदान

संतोष मते व प्रसन्न धुमाळ यांना ‘उत्कृष्ट निवेदक’ पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर :- आमदार लहू कानडे यांच्या लोकहक्क फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कार या वर्षी महाराष्ट्रात नावालेले सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते व प्रसन्न धुमाळ यांना नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. आमदार लहू कानडे, ज्येष्ठ साहित्यीक व पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

            येथील आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात पुरस्कार वितरणर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना मुरकुटे, ज्येष्ठ साहित्यीक प्रल्हाद येलूलकर, सामाजिक कार्यकर्ते शमशोद्दीन तांबोळी, इंद्रनाथ थोरात, अरूण नाईक आदी मंचावर उपसथित होते.

            मते व धुमाळ हे गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून निवेदनाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो जाहीरातींना स्वरबद्ध केले आहे. शेकडो समारंभांचे यशस्वी सुत्रसंचालन केले आहे. दोघेही अहमदनगर आकाशवाणी येथे नैमित्तीक उद्घोषक म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये मते यांची व्याख्याने आयोजित केली जातात. यापूर्वी समाजरत्नमराठा भूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. याशिवाय अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच दोघांनाही लोकहक्क फाऊंडेशनच्यावतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मते यांच्यासमवेत प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत उपस्थीत होते.


No comments:

Post a Comment

Comments system