Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

लोकहक्क फाउंडेशनचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार संतोष मते यांना जाहीर


श्रीरामपूर :-येथील लोकहक्क फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट निवेदक’ पुरस्कार यावर्षी महाराष्ट्रभर नावाजलेले सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते यांना जाहीर झाला  असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण मंगळवार दि. ७ रोजी सायं. ५ वा. बेलापुर रोडवरील यशोधन या आमदार लहू कानडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात करण्यात येणार आहेत. प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकरशाहीर संभाजी भगतशमशोद्दीन तांबोळी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थीतीत या पुरस्कारांचे वितरण होईल.

गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून मते हे निवेदनाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो जाहीरातींना स्वरबद्ध केले आहे. शेकडो समारंभांचे यशस्वी सुत्रसंचालन केले आहे. अहमदनगर आकाशवाणी येथे नैमित्तीक उद्घोषक म्हणून ते गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. यापूर्वी समाजरत्न, मराठा भूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. याशिवाय अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच लोकहक्क फाऊंडेशनच्यावतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी नामवंत वक्त्यांच्या भाषणातून श्रोत्यांना प्रागतिक विचारांची मेजवाणी मिळणार असून या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आमदात लहू कानडे यांनी केली आहे.


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात