चित्रकार रवी भागवत यांची
नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड
श्रीरामपूर
येथील सुप्रसिद्ध चित्रकार रवी भागवत यांची नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जायर यांनी नुकतेच भागवत यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
सुप्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस वर्षांपासून भागवत चित्रकला क्षेत्रात सक्रिय आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर व श्रीरामपूर याठिकाणी त्यांच्या चित्र व व्यंगचित्रांची प्रदर्शने भरली आहेत. अनेक शाळा महाविद्यालयांच्यावतीने त्यांच्या चित्रकला, व्यंगचित्र व कॅलीग्राफीच्या कार्यशांळांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१३ मध्ये त्यांनी व उदावंत यांनी श्रीरामपुरात रंगलहरी कला अकादमीची स्थापना केली. यामाध्यमातू चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, कॅलीग्राफी वर्गाद्वारे हजारो विद्यर्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अकादमीच्या माध्यमातून उदावंत यांच्यासह भागवत यांनी गरजू रूग्णांसाठी चित्रांद्वारे लाखो रूपयांचा निधी उभारला.
भागवत यांची यापूर्वी अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवरही निवड झाली होती. त्यांना अनेक मान्यवर संस्थांच्यावतीने पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष राकेश जायर यांनी दिली आहे. निवडीबद्दल चित्रकार भरतकुमार उदावंत, अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख बाबासाहेब खराडे, महाराष्ट्रात नावाजलेले अहमदनगर सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ट लिपीक अशोकराज आहेर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस जीवन सुरूडे, चित्रकार संदिप रूपवते, सत्यजित उदावंत आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment