🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

डाकले महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना डॉ.वैशाली सुपेकर समवेत प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, डॉ.सादिक सय्यद प्रा.सचिन कुलकर्णी

श्रीरामपूर- (प्रतिनिधी) स्त्रियांमध्ये प्रचंड शक्ती व ऊर्जा आहे.  स्त्रियांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून आपल्या कुशल कार्य, कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांना योग्य कौटुंबिक व सामाजिक वातावरण मिळाले तर त्या समाज विकास व परिवर्तनात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. स्त्रियांनी स्वतःमधील कौशल्य विकासाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, कारण समाजाने नेहमीच कर्तुत्वान महिलांचा सन्मान केला आहे. स्त्रीवादी चळवळ स्त्री व पुरुषांना बरोबर घेऊन वाटचाल करणारी आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात स्त्री पुरुष समानतेची दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली तर अनेक सामाजिक प्रश्न सुटू शकतील. समाज व तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. सोशल मीडियाचा वापर सजगपणे करा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन समृद्ध, सक्षम व निर्भय करा असे आवाहन डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वैशाली सुपेकर बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर यांनी भूषविले होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर यांनी आपल्या समाजाला  राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, कल्पना चावला, मेरी कोम यासारख्या कर्तृत्वान स्त्रियांच्या विचार, कार्य, कर्तृत्वाचा वारसा आणि वसा लाभला आहे. या कर्तृत्वान स्त्रियांनी जीवनात प्रचंड संघर्ष करून आपल्या कार्याचे पाडली आहे. त्यांच्या विचार कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करा असे सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब बावके,  वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र कळमकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, डॉ.मारुती केकाने, प्रा.सचिन कुलकर्णी, डॉ.बापूसाहेब घोडके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचे स्वागत डॉ.सादिक सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पूजा जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.कैलास दातीर यांनी मानले. कार्यक्रमास सहकारी प्राध्यापक व प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन -डाकले महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना डॉ.वैशाली सुपेकर समवेत प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, डॉ.सादिक सय्यद प्रा.सचिन कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Comments system