श्रीहरीकोटा शैक्षणिक सहल तालुकास्तरीय निवड चाचणी परीक्षा संपन्न......
जिंतूर- औरंगाबाद विभागात असणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. या उदात्त हेतूने औरंगाबाद विभागाचे कार्यतत्पर, तडफदार, प्रशासनतज्ञ विभागीय आयुक्त आदरणीय सुनील केंद्रेकर सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षापासून शास्त्रज्ञांची जयंती, नोबल पारितोषिक विजेत्या थोर व्यक्तींची जयंती, ऑलम्पिक पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा जन्मदिवस यासारखे उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा आणि स्पर्धा युगासाठी विद्यार्थी सक्षम बनविण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम चालू आहे.
केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील महत्त्वकांक्षी उपक्रम म्हणून अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी , तसेच थुंबा येथील स्पेस म्युझियम विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करणे निश्चित झाले आहे. या शैक्षणिक सहलीसाठी 27 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय निवड चाचणी संपन्न झाली. या निवड चाचणी परीक्षेत जिंतूर तालुक्यात एकूण 5759 एवढे विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी गुणानुक्रमे प्रत्येक केंद्रातून सर्वोत्तम पाच मुले व पाच मुली यांची निवड करण्यात आली . अशा गुणानुक्रमे केंद्रस्तरीय परीक्षेमधून निवड झालेल्या एकूण 183 मराठी माध्यमातील व 04 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध व वरिष्ठ कार्यालयाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून तालुकास्तरीय निवड चाचणी परीक्षा दिनांक 3 मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा जिंतूर शाखा क्रमांक 01 येथे आयोजित करण्यात आली.
श्रीहरीकोटा शैक्षणिक सहल तालुकास्तरीय निवड चाचणी परीक्षा व्यवस्थित, नियोजनबद्ध, दबावविरहित आणि नि:पक्षपातीपणे होण्यासाठी जिंतूर तालुक्याचे प्रचंड अभ्यासू, प्रशासन कुशल आणि कर्तुत्ववान गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांनी परीक्षा केंद्राचे नियोजन व विविध समित्यांचे गठन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाप्रमाणे परीक्षा क्रमांक देण्यात आले. या परीक्षा क्रमांकाचे दोन प्रती स्टिकर छापण्यात आले. एक स्टिकर बैठक व्यवस्थेसाठी तर दुसरे स्टिकर विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेसाठी वापरण्यात आले. या परीक्षा क्रमांकाच्या स्टिकरद्वारेच परीक्षा घेण्यात आली. परीक्षा क्रमांकाचे स्टिकर वापरल्यामुळे उत्तर पत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, केंद्राचे नाव टाकण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे एकूणच संपूर्ण परीक्षा नि:पक्षपातीपणे संपन्न झाली. परीक्षा भितीमुक्त व मोकळ्या वातावरणात संपन्न होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विशेष रांगोळी काढून उत्साहात भर घालण्यात आली. या सोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी उत्तम बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले.
या निवड चाचणी परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून जांब बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख तथा तालुका तंत्रस्नेही प्रमुख प्रवीण घुले यांची नेमणूक करण्यात आली. निःपक्षपाती पर्यवेक्षण व्हावे या हेतूने पर्यवेक्षक म्हणून गटसाधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती यांची नेमणूक करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तालुक्यात कार्यरत विज्ञान विषयातील तज्ञ गणित विज्ञान विषयाच्या शिक्षकांची पेपर तपासण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. उत्तर पत्रिकांची अचूक तपासणी करून पुन:श्च फेर तपासणी करून गुणानुक्रमे पुढील जिल्हा परिषद शाळेतील वैष्णवी मुक्तेश्वर शेळके (येसेगाव), कार्तिकी महादेव ठोंबरे (भोसी), आकांक्षा रणजीत मानवते (करवली), अनुराधा बाबा चव्हाण (प्रशाला भोगाव), समीक्षा शरद महाजन (प्रशाला कौसडी), या पाच मुलींची व भागवत परमेश्वर बुधवंत (जांब बुद्रुक) शुभम बालासाहेब गायकवाड (माणकेश्वर), ऋषिकेश सुदाम खरात (वाघी), अनुराग नंदकिशोर डवळे (येसेगाव), अनिकेत बाळासाहेब शिंदे (प्रशाला कौसडी) या पाच मुलींची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांच्याकडून निवड झालेल्या गुणानुक्रमे या पहिल्या पाच मुले व मुली यांचा आकर्षक प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे. तसेच एकूण 187 केंद्रस्तरावर विजेते विद्यार्थी यांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांचेही मनोबल वाढविण्यात येणार आहे.
निवड परीक्षा उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब जल्हारे, केंद्रप्रमुख दिनकर घुगे, ढाकणे राजेंद्र, प्रभाकर नालंदे, कवी मयूर जोशी, देशमुख , टाकणसार, विकास सातभाई,रवी मुंढे , खुडे,माजीद सर यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विषय साधन व्यक्ती , विशेष शिक्षक या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment