🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

मोरगे पाटील फाउंडेशनचे कार्य गौरवस्पद-योगेश महाराज मोरगे



(श्रीरामपूर-) 

मोरगे पाटील फाऊंडेशनच्यावतीने विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद असून यांनी धार्मिक  कार्यक्रमाचे देखील आयोजन करावे. गौरवोद्गार योगेश महाराज मोरगे यांनी काढले.

मोरगे पाटील परिवार व मोरगे पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोरगे पाटील मळा या फलकाचे उद्घाटन हभप योगेश महाराज मोरगेडॉ. विनायक मोरगे यांच्या हस्ते पार पडले. तसेच मोरगे पाटील परिवारडावखर पाटीललबडे पाटीलबोंबले पाटील व फरगडे पाटील परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी हभप योगेश महाराज मोरगेतालुका अध्यक्ष राष्ट्रीय भागवत धर्मरक्षा परिषद महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले कीआज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मोरगे पाटील फाउंडेशन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. यापूर्वी यांनी विविध उपक्रम करून यशस्वीपणे पार पाडले.

अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. विनायक मोरगे यांनी सांगितले की श्रीरामपूर शहर तालुक्यात मोरगेडावखर,लबडेबोंबले व फारगडे  परिवार शेकडो वर्षापासून स्थायिक आहेत सर्वांनी अशाच प्रकारे एकमेकांचे सुख दुःखात एकत्र यावेत तसेच एकोप्याने  राहावे. आपली आपली पिढी ही अत्यंत हुशार असून आपला तरुण युवक विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी एका प्रकारे चांगला ठसा उमटविला आहे. हि  अभिमानास्पद बाब आहे. यावेळी ओम प्रदीप मोरगे यांनी नुकतेच एसएससी परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यशिय  सूचना दिनकरराव मोरगे  तर अनुमोदन संजय मोरगे  यांनी केले तर प्रास्ताविक वामनराव मोरगे यांनी केले या कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे  स्वागत मोरगे पाटील परिवार तसेच नारायणराव डावखरअण्णासाहेब डावखरऋषिकेश डावखरसंदीप डावखर,  नंदकुमार लबडेवसंतराव लबडेअण्णा पाटील लबडेचांगदेव गोराणे,  गोरखनाथ बर्वेपंडितराव बोंबलेअप्पासाहेब बोंबलेसुधाकर बोंबले, शिवराज रसाळसोमनाथ शिंदे, शुभम आढाव, प्रवीण फरगडे आदी  मान्यवर उपस्थित होते

हभप योगेश महाराज यांचा सत्कार डॉ. विनायक मोरगे व डॉ. विनायक मोरगे यांचा सत्कार शिवाजी महाराज मोरगे यांनी केला आभार फाउंडेशनचे सचिव ऋषिकेश मोरगे यांनी मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरगे यांनी केले

No comments:

Post a Comment

Comments system