जिंतूर (प्रतिनिधी-सौ. अश्विनी जोशी) दिनांक 22 जुलै 2024 रोजी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा गट साधन केंद्र, जिंतूर येथे घेण्यात आला. या अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात "कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने" या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपला विषय योग्य प्रकारे व निर्भीडपणे विद्यार्थ्यांनी मांडला. नेमलेल्या परीक्षकांनी निश्चित केलेल्या निकषानुसार गुणदान करण्यात आले. यानुसार प्रथम क्रमांक ऋषिकेश सुदाम खरात(संत तुकाराम विद्यालय धानोरा) द्वितीय क्रमांक कल्याणी प्रेमसुख बोराळकर (श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय, जिंतूर ) तृतीय क्रमांक पूजा विश्वनाथ काळे(एकलव्य बाल विद्या मंदिर, जिंतूर) सर्व विजेता विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी आकर्षक प्रमाणपत्र दिले. गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे , मंगेश नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. माकोडे व प्रशाला आडगाव च्या श्रीमती वायसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मेळाव्याचे सूत्रसंचालन मयूर जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्रातील राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, मारुती घुगे, विकास सातभाई, श्रीमती संगवई, श्रीमती तोडकर, प्रधान, नालंदे, गायकवाड, पेठे ,फड , राठोड , मुंढे यांनी परिश्रम घेतले.
🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न....
जिंतूर (प्रतिनिधी-सौ. अश्विनी जोशी) दिनांक 22 जुलै 2024 रोजी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा गट साधन केंद्र, जिंतूर येथे घेण्यात आला. या अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात "कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने" या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपला विषय योग्य प्रकारे व निर्भीडपणे विद्यार्थ्यांनी मांडला. नेमलेल्या परीक्षकांनी निश्चित केलेल्या निकषानुसार गुणदान करण्यात आले. यानुसार प्रथम क्रमांक ऋषिकेश सुदाम खरात(संत तुकाराम विद्यालय धानोरा) द्वितीय क्रमांक कल्याणी प्रेमसुख बोराळकर (श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय, जिंतूर ) तृतीय क्रमांक पूजा विश्वनाथ काळे(एकलव्य बाल विद्या मंदिर, जिंतूर) सर्व विजेता विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी आकर्षक प्रमाणपत्र दिले. गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे , मंगेश नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. माकोडे व प्रशाला आडगाव च्या श्रीमती वायसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मेळाव्याचे सूत्रसंचालन मयूर जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्रातील राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, मारुती घुगे, विकास सातभाई, श्रीमती संगवई, श्रीमती तोडकर, प्रधान, नालंदे, गायकवाड, पेठे ,फड , राठोड , मुंढे यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment