🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

सातव्या वेतन आयोगाची कोटीं रक्कम पालिका कर्मचाऱ्यांना अदाअध्यादेश निघाल्यानंतर महिनाभरातच आर्थिक लाभ प्रदान - मुख्याधिकारी जाधव


श्रीरामपूर

श्रीरामपूर नगर पालिका कार्यरत कर्मचाऱ्यांचे सुमारे ९० लाख तर निवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे ७० लाख अशी १ लाख ६० हजार रूपये रक्कम अदा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर अवघ्या महिन्याच्या आत ही रक्कम अदा करणाऱ्या पालिकांच्या यादीत श्रीरामपूर नगर पालिका आघाडीवर असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.                                                                                                                        

            श्रीरामपूर नगर पालिकेत सध्या ४७२ कर्मचारी कार्यरत आहेत तर २७० निवृत्त कर्मचारी आहेत. राज्य शासनाकडून अद्याप पालिकेला चौथ्या व पाचव्या हप्त्याची रक्कम प्रदान करण्यात आलेली नाही. परंतू पालिकेच्या वसुली विभागाने यावर्षी मोठ्या प्रमाणात कर वसुली केल्याने ही रक्कम अदा करता येऊ शकली. सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या व पाचव्या हप्त्यापोटी शासनाकडून पालिकेला सुमारे चार कोटी रूपये येणे आहे.

पालिकेची वसुली यंदा ८० टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्यामुळेच या रक्कमा अदा करता आल्या. सेवा निवृत्त कर्मचऱ्यांची कुठलीही अडवणूक पालिकेकडून होत नाही. शिवाय त्यांचे रजा रोखे, अंशदान, निवृत्तीलाभ तात्काळ अदा केले जातात असे मुख्याधिकारी जावध यांनी सांगितले.   

चौथा व पाचवा हप्ता तात्काळ अदा झाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सेवा निवृत्त पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपमुख्याधिकारी आय्युब सय्यद व लेखापाल महेश कौटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश अपील, उपाध्यक्ष यशवंत देवधर, सरचिटणीस चंद्रकांत सोनवणे, महंमद शेख, खजिनदार अशोक प्रधान, सदस्य अशोक हिवाळे, श्रीपाद बिल्दीकर, दिलीप लबडे, दगडू शेळके, बाळासाहेब फरगडे, प्रभाकर शिंदे, रावसाहेब काळे, मदन बागडे, इश्वर चावरीया, श्रीपत शेलार, धोंडिराम जोंधळे, रामण शेळके आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Comments system