🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

सुभाष गायकवाड यांना स्व. जयंतराव ससाणे स्मृती पुरस्कार प्रदान



श्रीरामपूर-
नागेबाबा परिवाराचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकताच स्व. माजी आमदार जयंतराव ससाणे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव हेमंत ओगले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले,माजी नगराध्य संजय फंड, माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे,  माजी नगरसेवक मुजफ्फर शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, रमण मुथ्था, दिपाली ससाणे, माजी राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब दिघे, बडदे,  आदी मान्यवर उपस्थितीत होते.
गायकवाड यांनी आतापर्यंत्त हालाखीची परिसथिती असलेल्या अनेक गरजू रूग्णांना राज्यातील अनेक मोठ्या रूग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून दिला. तसेच त्यांना उपचारासाठी अनेक धर्मदाय संस्थांकडून सुमारे सात कोटी रूपयांची मदतही मिळवून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तुळजा फाउंडेशन व साई सोशल फाउंडेशन यांच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्काराबद्दल अनेकांनी गायकवाड यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Comments system