श्रीरामपूर-
येथील मुख्य रस्त्यावरील पुर्वाश्रमीच्या कोटस्थाने यांच्या जमिनीच्या वादातील दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून भुमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक रविंद्र खरोटे यांनी महादेव कोटस्थाने यांचा अर्ज रद्द केला. त्यामुळे या जागेतील सुमारे दिडशे लोकांना महसूल सप्ताहादरम्यान न्याय मिळाला असल्याची माहिती अनिल भनगडे व सोमनाथ घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, मेन रोड येथील फायनल प्लॉट नंबर 814 सिटी सर्वे नंबर 35 पैकी 642 ते 691 ही मालमत्ता कोटस्थाने परिवाराकडे होती. त्यानंतर अनेक नागरिकांनी हे क्षेत्र खरेदी खत करून तसेच भाडे करार करून कब्जात घेतले. सध्या या ठिकाणी कोटस्थाने परिवाराची जागा प्रत्यक्ष शिल्लक नाही. गेल्या पन्नास वर्षापासून या जागेत जे राहतात अशा कब्जेदारांचे खरेदीखत झालेले आहे. त्यांच्या नगरपालिकेत नोंदी असून वीज कनेक्शन सुद्धा नावावर आहेत. असे असताना कोटस्थाने परिवारापैकी एका सदस्याकडून शांतीलाल पोरवाल, राजेंद्र कांबळे, किशोर गारोळे, शांताराम बकरे यांनी बिगर कब्जाचे पोकळीस्थ खरेदी खत करून घेतले. त्या खरेदी खताचा गैरफायदा घेऊन इतर जागा मालकांना जाहीर नोटीसद्वारे त्यांच्या कर्जावर हरकती घेतल्या. घर दुरुस्ती व बांधकामास अडथळे निर्माण केले.
सिटी सर्वे नंबर 691 चे मृत्युपत्र करणारे त्यांच्या नावाने कोठेही जागा शिल्लक नसताना यावर चेअरमन सर्वेट को-ऑफ जनरल स्टोअर्स श्रीरामपूर यांच्या नावे असून त्याची फसवणूक करून मुख्त्यार पत्र नोंदविले आहे. त्याचे खरेदीखत नोंदविले 24 जुलै 2023 च्या अर्जात सिटी सर्वे नंबर 691 मध्ये अर्जदार यांची नोंद भरली गेली होती.
सिटीसर्वे 35 सिटी सर्वे नंबर 642 ते 691 फायनल प्लॉट नंबर 814 मधील क्षेत्राचा मालकी हक्क सोमनाथ दशरथ घुगे, अनिल पुंडलिक, भानगडे चंद्रकांत, निवृत्ती क्षीरसागर, सुदर्शन झुंबरलाल बाफना, विजय झुंबरलाल बाफना, अभय झुंबरलाल बाफना, सरबजीतसिंग करतारसिंग बत्रा व इतर यांच्याकडे आहे. याबाबत भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष रवींद्र खरोटे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून व कागदपत्रांची शहानिशा करून अर्जदार श्रीकांत माधव कोटस्ताने यांचा अर्ज रद्द केला. तसेच फेरफार क्रमांक 17 267 नामंजूर केला. हा न्याय मिळाल्याबद्दल महसूल सप्ताह चालू असताना दीडशे नागरिकांना न्याय दिल्याबद्दल त्यांचा कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड. अरुण जंजिरे, ॲड. सुशील चंदन, निलेश कुवर, संजय मूगदिया, महेश तलरेजा, सुधीर चापानेरकर, सुमित धुमाळ, अभिजीत मयूर, राजकिरण माळवे, ऋषिकेश क्षीरसागर, जलील पठाण, सरबजीतसिंग बत्रा, सोमनाथ घुगे, अनिल भानगडे, रवी पवार आदी उपस्थित होते .

No comments:
Post a Comment