Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा अनोखा उपक्रम


डॉ.फैजी खान यांनी केली शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला मदत

सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा अनोखा उपक्रम


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस के खान व खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महेजबीन खान यांची कन्या डॉक्टर फैझी खान (वैद्यकीय अधिकारी,रुबी हॉल, पुणे) यांनी आपल्या पहिल्या वेतनातील काही रक्कम शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी जिजामाता तरुण मंडळ व शिवसेनेमार्फत शहरातील शहरवासीयांच्या सेवेसाठी घेतलेल्या ॲम्बुलन्सला मदत म्हणून दिली आणि आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे पालन केले.
शिवसेनेतर्फे शहरातील नागरिकांच्या सेवेमध्ये एक रुग्णवाहिका नुकतीच अर्पण करण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिकेचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी नागरिकांच्या मदतीची आवश्यकता असते.ही गोष्ट डॉक्टर फैजी खान यांना माहित पडल्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील नोकरीच्या पदार्पणातील पहिल्या वेतनातील रकमेतून काही रक्कम या रुग्णवाहिकेस मदत म्हणून शिवसेना नेते संजय छल्लारे यांच्याकडे सुपूर्त केली.याप्रसंगी
 श्री व सौ एस के खान, श्री व सौ संजय छल्लारे, संजय आगाशे,कल्याण कुंकूलोळ,डाॅक्टर प्रशांत चव्हाण,मर्चन्ट असोसिएशन संचालक बाळासाहेब खाबिया,
बाळासाहेब कासलीवाल,धर्मेश शहा,श्री तांबे,निलेश बोरावके,दत्तात्रय धालपे,सुमित मुथ्था आदि उपस्थित होते.
डॉक्टर फैझी खान यांचे संपूर्ण कुटुंब हे सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असतो.त्यामुळे कुटुंबाचा तोच आदर्श समोर ठेवून त्यांनी देखील आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली व रुग्णवाहिकेस मदत केली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात