🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

प्रा. खालिद शेख यांना पीएच.डी.पदवी प्रदान


 श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे

येथील डॉ. खालीद अन्सार शेख यांना पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. प्रगतिशील शेतकरी व एकलहरे सोसायटीचे चेअरमन अन्सारभाई जाहागीरदार यांचे ते चिरंजीव आहेत

आकुर्डी येथील डॉ. डीवाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. खालीद शेख यांनी संख्याशास्त्र या विषयात सादर केलेल्या प्रबंधाला पीएचडी मिळाली. याकामी त्यांना डॉ. सुदेश कुमार यांचे मार्गदर्शन तर डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डीचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांचे सहकार्य लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार लालमोहम्मद जाहगीरदार, अनिसभाई जाहागीरदार, नूरअहेमद जाहागीरदार, रिजवान जाहागीरदार, सरंपच रिजवाना अनिस, माजी सरपंच नसिमखातून लालमोहमद जाहागिरदार, व्हा. चेअरमन सौ. सदफनाज रिजवान जहागीरदार, फरिदा अन्सार, फिरोजा इरफान शेख, फरजाना जहीर शेख, अॅड. जोएफ शेख, आलमास अर्शद शेख, ताज पटेल, अकबर पटेल, इरफान शेख, मन्सुर इमाम, राजमहमंद बाबाबिया पटेल, मोहसीन राजमहोमंद पटेल, राहिल राजमोहंमद पटेल, ख्वाजा हुसेन शेख, शकुर फय्याज, करिम आझम शेख, रहेमानदादा मिया, इमाम अब्दुल वाहाब शेख, विलास ठोंबरे, उपसरपंच रमेश कोल्हे, अग्रवाल, बबन झिने, समीर मनियार, तागड आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व एकलहरे ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Comments system