अहमदनगर क्रीडा विभाग समिती व सी.डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (मुली) स्पर्धेमध्ये सी.डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स,श्रीरामपूर महाविद्यालयास विजेतेपद प्राप्त झाले असून या बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात २-१ अशी आघाडी घेत राजर्षी शाहू महाविद्यालय संघाचा पराभव करत विजय संपादन केला.
या विजयी संघात कु.गौरी मोरगे,प्राची जावळे,डिंपल गक्खड,भावना पाटील,सृष्टी कोळगे, वैष्णवी जाधव, अमृता ओहळ, गायत्री फोपसे, सृष्टी पगारे, वंदना कणसे, श्वेता वाघमारे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आदरणीय मा.मीनाताई जगधने, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सुभाष देशमुख,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.अनिकेत खत्री, एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा.विजय नागपुरे,आय.क्यू सी. समन्वयक डॉ.संतोष घंगाळे, पर्यवेक्षक श्री.विजय दळवी,अधिक्षक श्री.सोमनाथ पथवे, क्रीडा शिक्षक श्री.सुनिल बनसोडे,प्रा.बाळासाहेब शेळके,सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले
No comments:
Post a Comment