🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

मंञी विखे पाटील यांनी केला रोलबॉल चॅम्पियन वेदांत घुगे याचा सत्कार

मंञी विखे पाटील यांनी केला रोलबॉल चॅम्पियन वेदांत घुगे याचा सत्कार



श्रीरामपूर

गोवा येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या एशियाई रोलबॉल चॅम्पियन स्पर्धेमध्ये श्रीरामपूरचा भूमिपुत्र वेदांत सोमनाथ घुगे या खेळाडूने अप्रतिम खेळ केल्यामुळे भारतीय रोलबॉल संघाला सुवर्णपदक मिळाले. या खेडाडूचा राज्याचे जलसंपदा मंञी ना. डाॅ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व रोलबॉल खेळा बाबत सविस्तर माहिती घेतली. घुगे परिवारातीलच हर्षल सोमनाथ घुगे या खेळाडूने रोलबॉल चॅम्पियन स्पर्धेमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला. आज हर्षल घुगे हा आयकर अधिकारी म्हणून सरकारी सेवेत आहे. मुलांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये प्रतिनिधित्व दिले जाते. आज हर्षल घुगे याच्या नंतर वेदांत या खेळाडूने श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्याची मान उंचावली आहे असे ही मंञी विखे पाटील सांगून हा अहिल्यानगर जिल्ह्यासह  महाराष्ट्राला अभिमान आहे. यानिमित्त घुगे परिवारांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपा उत्तर जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, कैलास दुबय्या, चंद्रशेखर दुबय्या, सोमनाथ घुगे, भाग्यश्री घुगे, हर्षल घुगे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Comments system