श्रीरामपूर (प्रतिनिधी): रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूर मध्ये पद्मभूषण मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या १३ शाखांच्या अंतर्गत कबड्डी, खो-खो व खुल्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन दि. १२ व १३ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मा. मीनाताई जगधने, सदस्या, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था, सातारा, श्री. नवनाथ बोडखे, विभागीय अधिकारी, उत्तर विभाग, र. शि. सं. सातारा व श्री. काकासाहेब वाळुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन झाले व सर्व खेळाडूंनी दिमाखदार संचलन केले.
खो- खो (मुले) : सी.डी.जे. कॉलेज विजेते, खो- खो (मुले) : यशवंत विद्यालय, पढेगाव उपविजेते, कबड्डी (मुले) आर. बी. एन. बी. कॉलेज विजेते, कबड्डी (मुले) न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभान उपविजेते तसेच खो- खो (मुली) सी.डी.जे. कॉलेज विजेते, खो- खो (मुली) : डी. डी. काचोळे विद्यालय, उपविजेते, कबड्डी (मुली): यशवंत विद्यालय, पढेगाव विजयी, कबड्डी (मुली): औटी विद्यालय, मालुंजे उपविजेते. याचबरोबर, मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण राऊत (संगमनेर) याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेत तनुजा उदारे (आर.बी.एन.बी. कॉलेज) हिने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मा. मीनाताई जगधने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा आयोजनासाठी प्रा. सुभाष देशमुख, डॉ. विजय म्हस्के, प्रा. सुनील बनसोडे, प्रा. संभाजी ढेरे, प्रा. बाळासाहेब शेळके व महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment