Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

गणेश भागडे ठरला 'विद्यापीठ श्री'


श्रीरामपूर (प्रतिनिधी): पद्मभूषण मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त डाकले महाविद्यालयात सलग १५ व्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आंतरविभागीय पॉवरलिफ्टिंग व शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक ११ व १२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे शहर व पुणे जिल्हा या चार विभागांनी उत्साही सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन मा. मीनाताई जगधने, सदस्या, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले. 
शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद अनुक्रमे नाशिक विभागाने तर पावर लिफ्टिंग (पुरुष) गटामध्ये पुणे जिल्हा विभागाने व पुणे जिल्हा विभागानेच पावर लिफ्टिंग (महिला) यांनी पटकावले. २०२४-२५ वर्षीचा 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ श्री' किताब नाशिक विभागाच्या गणेश भागडेने पटकावला. नाशिक विभागाच्या परवेज आत्तारने स्ट्रॉंग मॅन ऑफ सा.फु. पु.वि.: २०२४-२५ तर पुणे जिल्हा विभागाच्या वैष्णवी शेट्टी हिने स्ट्रॉंग वुमन ऑफ सा.फु.पु.वि.: २०२४-२५ पटकावले. स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला मा. प्रकाश निकम पाटील, सदस्य, जनरल बॉडी, र. शि. सं. सातारा, डॉ. रवींद्र जगधने,  मा. प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, श्री. लकी सेठी व प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर उपस्थित होते. तर स्पर्धांचे पारितोषिक वितरण माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. किशोर निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धांच्या संयोजनासाठी सचिव म्हणून प्रा. सुभाष देशमुख व प्रा. बाळासाहेब शेळके यांनी उत्कृष्ट नियोजन केले. स्पर्धांना अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. 
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात