🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

निवेदक म्हणजे कार्यक्रमाचा आत्मा- डॉ.आनंद चवई


निवेदक म्हणजे कार्यक्रमाचा आत्मा- डॉ.आनंद चवई

श्रीरामपूर-

कोणत्याही सामाजिक राजकीय सांस्कृतिक किंवा शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शन मधील कार्यक्रमाच्या सादरीकरणात निवेदकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून तो त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो ,म्हणून निवेदकाने नेहमी श्रवण चिंतनवाचनमनन,सराव व अभ्यास करून प्रकटावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी व कम्युनिटी रेडिओचे प्रमुख डॉ. आनंद चवई यांनी केले आहे

येथील शासकीय विश्रामगृहात अँकर्स असोसिएशन श्रीरामपूर यांच्यावतीने आयोजित एक दिवसीय वक्तृत्वनिवेदन आणि सूत्रसंचालन कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक किशोर निर्मळ तसेच पत्रकार व चित्रकार रवी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती

प्रास्ताविक व स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आदिनाथ जोशी यांनी केले तर परिचय ॲड. अजय चौधरी यांनी करून दिला यावेळी चित्रकार रवी भागवत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा  दिल्या व हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून संयोजन सुंदर आहे .अध्यक्षीय मनोगतात बोलताना उद्योजक किशोर निर्मळ म्हणाले की महानगरांमध्ये असे उपक्रम होतात तथापि श्रीरामपूर सारख्या भागात अशा पद्धतीचा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेत पहिल्या सत्रामध्ये आकाशवाणीचे निवेदक तथा सूत्रसंचालक व कार्याध्यक्ष संतोष मते यांनी रेडिओवरील निवेदन व संवर्धन कौशल्ये या विषयावर तसेच आकाशवाणीचे सूत्रसंचालकसमुपदेशक व उपाध्यक्ष प्रसन्न धुमाळ यांनी सामाजिक व शासकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व दूरदर्शनचे वार्ताहर व‌ सुकाणू समितीचे सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गवले यांनी दूरदर्शन व विविध चॅनेलच्या मुलाखती व वृत्त संकलन या विषयावर मार्गदर्शन केले

दुसऱ्या सत्रामध्ये ॲड.

प्रवीण जमधडे यांनी वाढदिवसकार्पोरेट इव्हेंट ,होम मिनिस्टरखेळ पैठणीचा अआदी कार्यक्रमाचे संचालन या विषयावर तर प्रसिद्ध कवियत्री व‌ साहित्यिक सौ.संगीता फासाटे यांनी काव्यसंमेलन व साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन या विषयावर व सुकाणू समितीचे सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक सलीमखान पठाण सर यांनी राजकीय सूत्रसंचालन तसेच निवेदनात शेरोशायरी चा प्रभावी वापर या विषयावर मार्गदर्शन केले

या कार्यशाळेस हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये,राज्य अधीस्वीकृती समितीचे सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे ,राजेंद्र बोरसेमहेश माळवेस्वामीराज कुलथेडॉ.वसंत जमधडे

प्रा.लक्ष्मण कोल्हे,पर्यवेक्षक वसंत मोरे यांनी सदिच्छा भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पत्रकार प्रकाश कुलथे म्हणाले की श्रीरामपुरातील सांस्कृतिक व सामाजिक चळवळ पुनर्जीवित करण्याचे कार्य अँकर असोसिएशनच्या माध्यमातून होत असून आगामी काळात भरीव सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले

प्रशिक्षणार्थी मधून सीताराम कातोरेविनायक होनॲड साधना निपूनगे,राजेंद्र बोरकर,संतोष भडांगे,फैजिन शेख

यांनी कार्यशाळेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या सायंकाळी समारोप सत्रामध्ये सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी झालेल्या विविध सत्रांचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख विलास कुलकर्णी व खजिनदार

प्रा. सतीश म्हसे यांनी केले तर आजीव सदस्य राजेंद्र हिवाळे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत ऊत्तर नगर जिल्ह्यातील अकोलेसंगमनेरकोपरगाव,राहाता ,नेवासा व श्रीरामपूर येथील सुमारे ७० प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अवधूत कुलकर्णी,कु श्वेता मते,कल्याणी रसाळगणेश पिंगळे ॲंकर असोसिएशनचे सर्व सदस्य व प्रशिक्षणार्थी यांनी परीश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Comments system