Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा; लॉकडाऊनमध्ये केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा मिळाली


मदुराई:-मदुराईतील सातानुकुलम पोलीस स्टेशनमध्ये 2020 साली कोरोना काळात वडील आणि मुलाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने 9 पोलिसांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर सर्व दोषींना दंड देखील ठोठावला आहे.

तुतीकोरन जिल्ह्यातील सातानुकुलम येथील व्यापारी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स या दोघांना पोलिसांनी 19 जून 2020 रोजी कोरोनाकाळात ताब्यात घेतले. आणि अतिशय निर्दयपणे मारहाण केली.

त्यानंतर त्यांना 21 जून रोजी कोविलपट्टी तुरुंगात ठेवण्यात आले. 22 जून रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला तर जयराज यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर देशात मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने या प्रकरणाचे स्वतःहून दखल घेत पोलिसांकडून अहवाल मागवला. मग हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सातानुकुलम जे स्टेशन इंचार्ज श्रीधर हे होते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील सर्व 10 आरोपींना निलंबित करण्यात आले आणि त्यांना अटक करुन मदुराईतील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. या आरोपींपैकी एक जण पालदुरई याचा मृत्यू ऑगस्ट 2020 मध्ये कोव्हिडमुळे झाला. इतर 9 आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन भागात 2427 पानांचे चार्जशीट दाखल केले. प्रकरणाची सुनावणी मदुराईचे पहिले अतिरिक्त न्यायाधीश यांच्या सत्र न्यायालयात झाली. त्यांनी सर्व आरोपींचा जामीन फेटाळला होता.

23 मार्चला न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आणि 6 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात