Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
→
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...
→

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, पंचनाम्यानंतर पिंजरा लावण्याचे वन विभागाचे आश्वासन


एकलहरे (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), दि. ३० जुलै : एकलहरे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सलीम शेख यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली होती. सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले, मात्र शेळीचा जीव वाचू शकला नाही.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकारी अक्षय बड़े यांच्या उपस्थितीत मृत शेळीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्ते साहिर बकश जहागीरदार, ख्वाजा जहागीरदार, शेतकरी सलीम शेख तसेच अल्ताफ शेख, सद्दाम शेख, आरिफ शेख, सोहेल शेख, मौसिन शेख, फारूक शेख, इमरान ईनामदार, अंसार शेख, सादिक शेख, शफीक शेख, जावेद शेख, साजिद शेख हुजेफ शेख आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचनाम्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात वारंवार बिबट्याचा वावर होत असल्याने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यावर वन अधिकारी अक्षय बड़े यांनी लवकरच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. वन अधिकाऱ्यांच्या या आश्वासनाचे ग्रामस्थांनी स्वागत करत त्यांचे आभार मानले.

वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत आणि बिबट्याचा वावर दिसल्यास त्याला घेरण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे एकलहरे व परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात