Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

अहिल्यानगर हादरलं! मुकुंदनगरमध्ये धीरज परदेशींवर जीवघेणा हल्ल्याचा आरोप; ४ आरोपींवर गुन्हा, एकाला अटक



“इसको मार डालो” म्हणत मारहाण केल्याचा तक्रारीत आरोप; पोलिसांची धडक कारवाई

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात स्ट्रीट लाईट पॅनलचे काम सुरू असताना धीरज कचरुसिंग रजपुत उर्फ धीरज परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी युनुस शेख याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर परिसरात स्ट्रीट लाईट पॅनलचे काम सुरू असताना संबंधित वादातून धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी मारहाण करताना “इसको मार डालो” असे म्हटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेत धीरज परदेशी यांना मारहाण झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, युनुस शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, घटनेपूर्वी कोणता वाद झाला होता आणि हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिस तपासातून पुढील बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात असून, न्यायालयीन निर्णय होईपर्यंत आरोपींना दोषी ठरवता येणार नाही.

पोलिस तपासाकडे लक्ष

मुकुंदनगरमधील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास आणि इतर आरोपींच्या शोधासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात