Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
→
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...
→

ताज्या बातम्या

मुलीच्या लग्नासाठी जपलेले सोन्याचे गंठण पुन्हा मिळाले; बेलापूर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक



बेलापूर प्रतिनिधी : मुलीच्या लग्नासाठी आर्थिक नियोजन करून तयार केलेले सोन्याचे गंठण घरातून गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बेलापूर पोलिसांकडे माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित सोन्याचे गंठण पुन्हा मिळाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मीना विलास गोसावी यांनी मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे गंठण तयार करून ते घरातील दिवाणमध्ये सुरक्षित ठेवले होते. शनिवारी दुपारी दागिना नियोजित ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात आणि परिसरात शोध घेऊनही गंठण न मिळाल्याने त्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.


पोलिसांनी घटनेची माहिती घेत परिसरातील नागरिकांकडून चौकशी केली. तसेच उपलब्ध माहितीनुसार पुढील तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. पोलिसांच्या या प्रयत्नांनंतर काही वेळातच गंठण पुन्हा दिवाणमध्ये आढळून आले.
गंठण परत मिळाल्यानंतर मीना गोसावी यांनी पोलिसांचे आभार मानले. या घटनेत नेमकी परिस्थिती काय होती, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेबद्दल गोसावी कुटुंबीयांकडून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक विशाल खैरे, हवालदार गणेश भिंगारदे, हवालदार मनोज गोसावी, हवालदार बाळासाहेब कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, जालींदर माने, आकाश वाघमारे आणि होमगार्ड महेश थोरात यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विलास गोसावी, शांताराम गोसावी, तुळशीराम हिंगे आणि माजी सरपंच गणेश उमाप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात