श्रीरामपूर शहरात चार कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई; चालकांविरुद्ध गुन्हे दाखल
श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील काही कॅफेंमध्ये नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या प्रकारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील चार कॅफेंवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली असून, संबंधित कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
कॅफेच्या आडून काही ठिकाणी बंदिस्त जागांचा वापर होत असल्याच्या तक्रारी आणि माहितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समोर येत आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर कॅफे चालकांमध्येही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कॅफे व्यवसाय करताना आवश्यक परवानग्या, स्थानिक नियम तसेच पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
श्रीरामपूरमधील या कारवाईनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅफेंवर पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारवाईतील गुन्ह्यांचे नेमके कलम, कॅफेंची नावे आणि संबंधित चालकांची अधिकृत माहिती पोलिसांकडून स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाचे अधिक तपशील समोर येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा