ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांच्या निधनाने शोककळा आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी डावरे कुटुंबीयांची घेतली भेट
बेलापूर बु., ता. श्रीरामपूर | ६ सप्टेंबर २०२६
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथील ज्येष्ठ पत्रकार कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बेलापूर परिसरासह पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कै. विष्णुपंत डावरे हे भाजपचे प्रफुल्ल डावरे यांचे चुलते होते.
कै. डावरे यांच्या पार्थिवावर ३ सप्टेंबर २०२६ रोजी अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. बेलापूर बु. येथील वाबळे गल्ली परिसरातून अंत्ययात्रा निघाली. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांची आज कुटुंबीयांना भेट
दरम्यान, आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी कै. विष्णुपंत डावरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन डावरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत शोक व्यक्त केला.
या भेटीप्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये शरद नवले, नितीन दिनकर, अभिषेक खंडागळे, हाजी इस्माईल शेख, रणजित श्रीगोड, भास्करराव खंडागळे, देविदास देसाई, पुरुषोत्तम भराटे, कणजीशेठ टाक, रावसाहेब अमोलिक, राकेश कुंभकर्ण, निलेश हरदास, मुस्ताक शेख, रमेश काळे, विशाल आंबेकर, अजिज शेख, सचिन वाघ, शफिक बागवान, सचिन अमोलिक, किशोर बोरुडे, करण गोसावी, अनिल थोरात, प्रभात कुऱ्हे कैलास शिंदे ,सुमित बोरुडे ,सुरज बडे ,मोहसीन सय्यद, यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
ज्येष्ठ पत्रकाराच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची हानी
कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने डावरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि डावरे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा