श्रीरामपूर प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे या गावातील सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी मिळून निधीचा अपहार केला असे आरोप उपसरपंच यांनी थेट पंचायती राज व्यवस्था कडे दिनांक ५/१०/२०१८ ला केल्याचे वृत्तांन मधून निदर्शनात आले त्यांनी नमूद केले कि मी एकलहरे ग्रामपंचायत येथील उपसरपंच या नात्याने कार्यरत आहे माझ्या समोर (समक्ष) ग्रामसेवक अधिकारी व सरपंच यांनी निधीचा अपहार केला असून त्यांच्यावर लवकरात लवकर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर त्यांना पाठिंबा देत ग्रामपंचायत सदस्य यांनीदेखील सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे निदर्शनात आले आहे
याचा पाठपुरावा म्हणून परत एकदा निवेदन देण्यात आले
ग्रामपंचायत मधील झालेल्या गैव्यवहारप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य १) राज मोहम्मद बाबा मिया शेख २) वैशाली अर्जुन मकासरे ३) बेबी राव निकम ४) कोकिळा संजय अग्रवाल यांनी दिनांक १२/१२/२०१९ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता
त्या तक्रारी अर्जावर देखील कोणती कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती श्री अनिस आजम शेख यांनी दिली
सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर
आजपर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही
जर उपसरपंच व ग्रामपंचायत मध्ये असणारे सदस्य यांच्या तक्रारीला महत्त्व दिले जात नाही तर साध्या (गरीब) जनतेला न्याय मिळेल का ?
अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाली आहे
No comments:
Post a Comment