श्रीरामपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही धार्मिक स्थळे खुली करावीत या मागणीसाठी आज येथील श्रीराम मंदिर व श्री हनुमान मंदिरासमोर भारतीय जनता पक्षाच्यावतीने शंखनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले, मंदिर परिसर शंखनाद व घंटा नादाने दुमदुमले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे अर्थात मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्ध विहार देशभरात खुली करण्यात आली आहेत. पण महाराष्ट्रातील सरकारने एकीकडे माँल, बाजारपेठा,दारूची दुकाने, बार,हाँटेल सुरू करण्यास मोकळीक दिलेली आहे.तर दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करण्यास अजूनही मोकळीक न देता निर्बंध कायम ठेवले आहेत.
राज्य सरकारकडून मनमानी कारभार सुरू असून. जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार केला जात नाही. सरकारचे हे धोरण अतिशय आदमुठेपणाचे असून भारतीय जनता पार्टी ही मनमानी सहन करणार नाही. याविओढत आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. या मनमानी ध्येय धोरणाचा यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.
शिक्षक प्रकोष्ठ जिल्हा संयोजक शशिकांत कडुस्कर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतीश सौदागर, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अजित बाबेल, मिलिंदकुमार साळवे श्री देवीदास चव्हाण आदींनी यावेळी बोलताना सरकारच्या धोरणावर आसूड ओढत तीव्र शब्दात ठाकरे सरकारचा तीव्र निषेध केला.
या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे विशाल यादव रूपेश हरकल, अक्षय नागरे, अक्षय वरपे यांच्यासह प्रसाद बिल्दीकर, विजय देवकाते, तेजस उंडे, पंकज करमासे, विशाल अंभोरे, अमोल अम्बिलवादे, विजय आखाडे, सिकंदर पटेल, अरूण शिंदे, रवी पंडित, साजिद शेख, शिवराज रसाळ, योगेश ओझा, रमेश आजगे, सुरेश आजगे, गणेश अभंग, हंसराजसिंग बतरा, श्रेयस झिरंगे प्रफुल्ल गायकवाड़, गौरव भागवत, गौतम जावरे, आदी या शंखनाद घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment