श्रीरामपुर प्रतिनिधी: 'एक हात मदतीचा' हा उपक्रम समाजातील वंचित गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरण उपक्रम लाभदायक ठरत आहे. जीवन गौरव शैक्षणिक मासिक लेखक वाचक परिवारातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात सुभाषवाडी आणि रामगड ता.श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील शेती महामंडळाच्या कष्टकरी मजुरांच्या आर्थिकदृष्ट्या वंचित घटक व अल्पसंख्याक समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,मास्क आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम तळागाळातील शिक्षण प्रक्रियेचा दर्जा उंचावण्यासाठी मदतीचा ठरेल असे मत बांधकाम अभियंता नानासाहेब जिवडे यांनी मांडले.जंतनाशक दिन असल्याने उपस्थित विद्यार्थ्यांना जंताच्या गोळ्यांचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील प्रसिद्ध अभियंता नानासाहेब जिवडे , तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचप्राण ट्रेकिंग समूहप्रमुख विजय विरकर ,सामाजिक कार्यकर्ते रजाभाई शेख ,मुख्याध्यापिका सावंतमॅडम, इमाम सय्यद,अकील शेख, आशावर्कर नंदाताई लोखंडे ,अंगणवाडी सेविका नवलेताई ,आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात अभियंते नानासाहेब जिवडे यांना जीवन गौरव मासिक साहित्यकला लेखक वाचक मंचाच्यावतीने सन्मानचिन्ह, मासिक ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,मास्क आणि खाऊ वितरित करण्यात आला.जीवन गौरव मासिक साहित्य, कला, लेखक, वाचक मंच अहमदनगर जिल्ह्यातर्फे सामाजिक कार्यकर्ता रजाभाई शेख यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंपादक रज्जाकभाई शेख यांनी केले. तर आभार सहसंपादक देविदास बुधवंत यांनी मानले.
No comments:
Post a Comment