श्रीरामपूर प्रतिनिधी: भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लोमधून गावतळी,छोटेमोठे पाझरतलाव, अशोक बंधारे, ओढ्यावरील केटी वेअर्स भरून मिळावित अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने वडाळा उपविभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.
निवेदनात म्हलटे आहे की, भंडारदरा धरण भरून निळवंडे धरण भरल्यानंतर ओव्हर फ्लो प्रवरा नदीपात्रात सुरू झाला आहे. या ओव्हर फ्लोच्या पाण्यामधून प्रवरा डावा कालवा आणि उजवा कालवा या दोन्ही कालव्यांवरील गावतळी, छोटेमोठे पाझर तलाव,अशोक बंधारे, ओढ्यावरील केटी वेअर्स, लघु पाटबंधारे विभागाने बनविलेले शिवकालिन पाणी साठवण तलाव,प्राधान्याने भरून मिळावे जेणेकरून लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. लाभक्षेत्रात त्या मानाने पाऊसमान कमी असून पाझरतलाव छोटेमोठे बंधारे भरल्यानंतर विहिरी आणि कुपनलिकेला पाणी वाढून धरणाचे एक रोटेशन वाचेल.प्रवरा नदीपात्रात चालू असलेले पाणी तात्काळ दोन्ही कालव्यांना सोडून हे सर्व गावतळी, बंधारे भरून मिळावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नितीन पटारे, जिल्हाध्यक्ष् शरद बोंबले, शहराध्यक्ष, दादा बडाख, जिल्हा संघटक निलेश बनकर, प्रवीण देवकर, गणेश धुमाळ आदींच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, श्रीरामपूर,तहसीलदार, श्रीरामपूर/राहुरी, व कार्यकारी अभियंता,अहमदनगर पाटबंधारे, अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment