🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कवी आनंदा साळवे यांना समाज भुषण पुरस्कार जाहीर


कवी आनंदा साळवे यांना समाज भुषण पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर-

            पुणे येथील महाराष्ट्र जोशी समाज समितीच्यावतीने दिला जाणारा ‘समाज भुषण’ हा पुरस्कार या वर्षी तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ग्रामिण कवी आनंदा साळवे यांना जाहीर करण्यात आला आहेपुरस्कार समारंभाचे आयोजक दिलीप परदेशी यांनी ही माहिती दिली आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार दि. १ रोजी सकाळी १ वा. कासारवाडी स्टेशनजवळील गारवे लॉन्स येथे होणार मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. कवी आनंदा साळवे यांच्या कवितांतून समाजप्रबोधन घडत असते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असलयाची माहिती समितीचे नंदकुमार जोशी, तानाजी खेडकर, ॲड. नितीन गारवे, निलेश पारगे, नंदकुमार खेडकर, सुशिलाताई मोरे, गजराताई पोटे आदींनी दिली आहे.

साळवे यांना आतापर्यंत राज्य भरातून  हून अधिक पुरस्कार मिळाले आहेतअनेक नामवंत कवी संम्मेलनांसाठी कवी साळवे यांना निमंत्रित केले जातेहा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कवी साळवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Comments system