🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

NIC ई-मेल तपासणी, निवेदन नोंदणी आणि तात्काळ कार्यवाही अनिवार्य


अहिल्यानगर जिल्हा शासकीय कार्यालयांना जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संजय कुंभार यांचा कडक आदेश NIC ई-मेल तपासणी, निवेदन नोंदणी आणि तात्काळ कार्यवाही अनिवार्य

अहिल्यानगर, दि. 21 नोव्हेंबर 2025 — जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांकडून येणारी निवेदने, तक्रारी, माहिती अधिकार अर्ज तसेच शासनाचे आदेश वेळेत प्राप्त व्हावेत, त्यांची नोंदणी व्हावी आणि त्वरित कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मा. संजय विष्णू कुंभार यांनी कडक आणि स्पष्ट आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशांचा हवाला देत श्री. कुंभार यांनी सांगितले की राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अधिकृत NIC ई-मेल आणि प्रचलित शासन संकेतस्थळाचा वापर नियमितपणे करणे बंधनकारक आहे.
ई-मेल किंवा ऑनलाइन माध्यमातून आलेली कोणतीही शासन माहिती, आदेश अथवा नागरिकांची निवेदने दुर्लक्षित राहू नयेत, यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.

अहवालानुसार, सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपक पाचपुते यांनी 18 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या निवेदनात काही कार्यालयांकडून ई-मेल व संकेतस्थळावरील माहिती तपासण्यात झालेल्या दुर्लक्षाबद्दल लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हा अधीक्षकांनी तत्काळ सर्व तालुका कार्यालयांना लेखी सूचना दिल्या.

मुख्य निर्देश काय?

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या कार्यालयातील NIC ई-मेल दररोज तपासणे अनिवार्य

शासन संकेतस्थळावर प्राप्त माहितीची तात्काळ पडताळणी

नागरिकांच्या निवेदनांची व्यवस्थित नोंद व पुढील कार्यवाहीचे पालन

आदेशांचे पालन न केल्यास प्रशासनिक कारवाई

सर्व तालुक्यांनी ‘अंमलबजावणी अहवाल’ जिल्हा कार्यालयास सादर करणे

जिल्हा अधीक्षक कुंभार यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांच्या अर्जांची दखल न घेणे अथवा शासन माहितीची वेळेत नोंद न करणे ही गंभीर प्रशासकीय त्रुटी असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.”

या आदेशामुळे जिल्ह्यातील महसूल, नगरभूषण तसेच अन्य विभागातील कार्यालयांची जबाबदारी अधिक कडकपणे निश्चित झाली असून नागरिकांना सेवा मिळण्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

— अहिल्यानगर प्रतिनिधी

No comments:

Post a Comment

Comments system