ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात
श्रीरामपुर प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था जनतेच्या दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झाल्या. स्वच्छ पाणी. सार्वजनिक स्वच्छता, अंतर्गत दळणवळण, शिक्षण, महिला व बालकल्याण कृषी आणि पशुसंवर्धन असे ग्रामीण जीवनाचे रोजचे विषय ग्रामपंचायत कडे अधिनियमानुसार सुपूर्द केलेले आहे. मी तब्बल २७ वर्षे विकास प्रशासनात काम केल्याने या साठीचे कायदे व योजनांची मी प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली आहे. माझ्या अनुभवाने एक सुंदर गोष्ट मला शिकवली व ती म्हणजे गाव करील ते ‘राव’ काय करणार? आणि यासाठी आवश्यक आहे; संपुर्ण गावाची एकजुट! हागणदारी मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्ष राबवितांना हा अनुभव वारंवार आला.
निवडणूका लोकशाहीचा मुलभूत पाया आहेत परंतु ग्रामसभाही लोकशीचाच सुसंस्कृत पर्याय आहे.निवडणूकांचे आजचे स्वरुप स्पर्धात्मक न राहाता युध्दजन्य बनले आहे. अनेक पक्ष व गट ग्रामपंचात निवडणूकीच्या निमित्ताने आप आपले वर्चस्व गावावर रहावे म्हणून काही कारभा-यांना आपलेसे करुन स्वता:च्या गटाची पार्टी तयार करुन लोकांना झुंजवतात. एकाच गावचे गावकरी अनेक गटातटामध्ये दुंभगले जातात.निवडून येण्याच्या इर्षेने एकमेकांना शाब्दीक जखमा होतात. काही हाणा मारीचे प्रसंगही उद्भवतात, म्हणून हे सर्व टाळावयाचे असल्यास ग्रामसभा घेऊन ग्रामपंचाय च्या सदस्यांची नियमानुसार बिनविरोध निवड केल्यास गावातील प्रेम व सौहार्द टिकू शकते.व त्याचा परिणाम गाव शिवारासाठीचा शासनाच्या विविध योजना एकजुटीने राबविण्यासाठी मदत होते,गावाचा झपाटयाने विकास होतो. हिवरेबाजार सारखी उदाहरणे आपल्याच जिल्हातील आहेत. म्हणूनच मतदार संघातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, अशा समंजस गावांसाठी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी मी ग्वाही देतो आमदार लहू कानडे यांनी सदरचे निवेदन प्रसिद्धी साठी दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा