‘अशोक’ सभासदांच्या हितरक्षणार्थ उसाचे दुसरे पेमेंट ८०० रूपयांप्रमाणे करावे- औताडे
श्रीरामपूर प्रतिनिधी :-अशोक सहकारी साखर कारखान्याने २००९ व २०१६ मध्ये एफ आरपी पेक्षाही जास्त दर ऊस उत्पादकांना दिला. आज साखरेचा दर ३४०० रूपये आहे. त्यावेळच्या हंगामांतील धोरणांचा विचार करता यावर्षी ८०० रूपये प्रति टनाप्रमाणे पेमेंट करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम २०२० -२१ यासाठी फआरपी २२०० रूपये प्रतिटन असून आपणाकडून तो सर्व उत्पादकांना अदा झालेला आहे. परंतू फआरपी हा अंतिम दर नाही. प्रती टन उत्पादन खर्चासाठी अंतिम दरापोटी १४ दिवासांच्या आत उस दर नियंत्रण आदेशानुसार पहिले पेमेंट आहे. अंतिम पेमेंट हे मुख्य साखर उत्पादनासह उपपदार्थ निर्मितीचे महसुली उत्पन्नातून सप्टेंबर अखेर पर्यंत करणे बंधन कारक आहे. परंतू मागील दहा वर्षांपासून आपल्या व्यवस्थापनाने महसुली उत्पन्नातून उत्तपादकांना पेमेंट केले नाही.
वास्तविक गाळप हंगाम २००९-१० चा एफआरपी १२४९ रूपये प्रतिटन असताना आपणाकडून २००० रूपये प्रतिटन दिला गेला. गत हंगामाचा तोडणी वाहतूक अडिचशे रूपये प्रतिटन होता. व साखरेचे दर २२०० रूपये प्रतिटन होते. तसेच गाळप हंगाम २०१६ मध्ये फआरपी १६४० प्रति मे. टन असून गत हंगामाचा तोडणी वाहतूक खर्च ९०९ रूपये प्रति मे. टन होता. साखरेचे दर २८०० रूपये प्रति मे. कविंटल होते.
२००९-१० ला ७५० रूपये प्रति मे. टन व २०१६-१७ मध्ये ५६० रूपये प्रति मे. टन एफआरपी पेक्षाही जादा दिले. आज साखरेचे दर ३४०० रूपये आहेत. तरी वरील दोन्ही हंगामात अवंलबविलेल्या धोरणांचा पूर्ण विचार करून उत्पादकांच्या हित रक्षणार्थ किमान ८०० रूपये प्रति मे. टनाने दुसरे पेमेंट देणे शक्य आहे. ते द्यावे अशी मागणी ऊस उत्पादक, सभासद व बिगर सभासदांच्यावतीने करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment