श्रीरामपूर प्रतिनिधी :तालुक्यातील कारेगाव - खोकर,अशोकनगर फाटा ते अशोकनगर, या रस्त्याचे सुरू असलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून याबाबत आवाज उठवूनअखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांनी वेळोवेळी आंदोलन केले. परंतु या कामा बाबत ना ठेकेदारास नोटीस बजावली ना संबंधीतअभियंत्यांवर कारवाई केली. अधिकारी हे ठेकेदार व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने या निकृष्ठ कामास जबाबदार कोण? असा सवाल पटारे यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पटारे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत आपण प्रभारी उपभयंता गुजरे यांच्याकडे विचारणा केली असता श्रीरामपूर विभागाला कायमस्वरूपी उपअभियंता नसल्याने काम करण्यास वेळ मिळत नाही अशी उत्तरे दिली जातात. तसेच प्रभारी उपअभियंत आणिकार्यकारीअभियंता संगमनेर विभाग हेच जर या निकृष्ट दर्जाचे कामे योग्य आहे, असं म्हणत असतील तरअधीक्षक अभियंता अहमदनगर यांच्याकडे कारेगाव -खोकर,अशोकनगर फाटा(निपणीवडगाव)ते अशोकनगर रस्त्या बाबत लेखी तक्रार देऊनआंदोलनाचा इशारा दिलाआहे. अधीक्षकअभियंता कुलकर्णीयांच्या सुचनेनुसार येथील गुजरे प्रभारी उपअभियंता याच्याशी चर्चा केली असता कारेगाव -खोकर रोड पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून 12 जुलै 2021 पासून आजपर्यत त्याची डागडुजी करण्याची सूचना ठेकेदारास दिलीनाही कारण विचारले असता माझेकडे वेळच नाही असे बेजबादारपणे उत्तर दिले जाते.
तसेच अशोकनगर फाटा तेअशोकनगर रोड साईडपट्टी साफ न करता तेथील अतिक्रमण न हटवता प्रवरा डावा कालव्याच्या पाण्यासाठी योग्य चर न खोदता भर पावसात आणि वाहत्या पाण्यात डांबर टाकून बी बी एम चा थर दिला त्याची विचारणाकेली असता रोड जिल्हा परिषद चा आहे आम्ही साईडपट्टी अतिक्रमण काढू शकत नाही साईड पट्टी ला जागा नसेल तर ते बिल काढणार नाही मगरस्ता करताच कशाला विचारलेअसता आम्ही फक्त एजन्सी म्हणून काम करतो. आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग हीच एजन्सी का वापरली जाते, जिल्हापरिषद बांधकाम विभाग ही एजन्सी आपले आमदार का सुचवीत नाही हे पण न उलगडणार कोंढ म्हणावं की आपल्या सोयीनुसार एजन्सी निवडून निकृष्ट कामाला खतपाणी घालणे होय ,त्याचप्रमाणे कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्ता हा अतिशय खराब झाला असून त्याची दुरुस्ती कडीत मांडवे शिवारात चालू आहे. तेथेही साईडपट्टी अतिक्रमण काढले नाही, पढेगाव ते कारेगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडले ते दगडुज्जी साठी घेतले नाही रोड क्रॉस पाईपलाईन ला अनधिकृत मूक संमती देऊन रस्त्याचं नुकसान केलेलं आहे
याप्रकरणी अधीक्षकअभियंता अहमदनगर कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे पाटील यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात दिला आहे.
No comments:
Post a Comment