🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान डॉ अनिल पावशेकर

प्रतिनिध (  डॉ अनिल पावशेकर): दि. २१ ऑगस्ट २०२१ ला ऑरेंज सिटी हॉस्पिटल, नागपूर इथे भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर जिल्हा (ग्रामीण) तर्फे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान राबविण्यात आले. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या संकल्पनेनुसार वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ प्रिती मानमोडे यांनी नागपूर जिल्हा अभ्यास वर्ग आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावकुळे यांनी केले तर अध्यक्षपदी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री अरविंदजी गजभिये होते.

या अभ्यासवर्गात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात विचारविमर्श आणि मार्गदर्शन करण्यात आले. याअंतर्गत डॉ विनोद दाढे यांनी स्वास्थ्य स्वयंसेवक संकल्पना आणि भूमिका, डॉ मुकेश मुदगल- कोरोना सामान्य माहिती, डॉ प्रदिप पाटील- कोविड अनुकूल व्यवहार, डॉ श्रीकांत वणीकर- रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे उपाय, पतंजली योग शिक्षक जवारकर मॅडम- योग, आसनांचे महत्व, डॉ सौरभ अग्रवाल- कोरोना प्राथमिक उपचार आणि डॉ नुरूल अमीन यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या संदर्भात खबरदारी आणि सतर्कता यावर समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्वास्थ्य स्वयंसेवक म्हणून नियुक्त केलेल्या सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री किशोरजी रेवतकर, महामंत्री श्री अजयजी बोढारे, महिला आघाडी अध्यक्षा संध्याताई गोतमारे, युवा मोर्चा अध्यक्ष आदर्शजी पटले, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख दिलावरजी खान, वैद्यकीय आघाडी विदर्भ समन्वयक डॉ विंकी रुघवानी, संयोजक डॉ अनुप मरार, सोशल मिडिया संयोजक श्री लकी सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल पावशेकर यांनी केले तर प्रस्तावना डॉ प्रिती मानमोडे यांनी मांडली. आभार प्रदर्शन डॉ विशाल कामदार यांनी पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला. या समारंभाला वैद्यकीय आघाडीचे जवळपास ७० सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Comments system