शिर्डी शहर प्रतिनिधी :कोयना नदीच्या खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक पणे आलेल्या पुरात चिपळूणकर अन्न व पाण्यावाचून बेहाल झाले, त्यांना मदतीचा आधार देण्यासाठी साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व साई नाईन ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आल्याची माहिती संचालक साईराज गायकवाड यांनी दिली. पुढे गायकवाड म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेकांचे प्राण गेले. अनेक लोक हे बेघर झाले. अन्न व पाण्यावाचून अनेकांचे हाल होत आहे. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून या बाबी जगासमोर येत आहे. त्यातून राज्य सरकार, सामाजिक संस्था ह्या पुढे येऊन आपल्या परीने योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. शिर्डीच्या सोशल मीडियावर चिपळूण येथील पूरग्रस्त समीक्षा हरवंदे यांच्या मार्फत तेथील पुरग्रस्तांच्या मदतीची याचना करण्यात आली होती. त्यास प्रतिसाद देत. आमचा ट्रस्ट, साईभक्त, व उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने पाणी, किराणा किट, बिस्कीट, आदींसह गरजेच्या वस्तू चिपळूण येथील स्वयंम फाउंडेशन यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द करण्यात आला. तर उपस्थितांना साई बाबांचा प्रसाद ही देण्यात आला. याप्रसंगी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू जठार, अभिषेक हरवंदे, सागर जठार, सुयोग कदम, श्रेयस गजरे, निखिल कदम, सौरभ नाटूस्कर, संकेत चव्हाण, विनायक शिंदे, निखिल जाधव, शुभम हरवंदे, अँड.भक्ती जठार, मंगेश देवळेकर, यश राजपूत, दादासाहेब पगारे, आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या समीक्षा हरवंदे म्हणाल्या की, पुराची परिस्थिती फारच गंभीर होती. ही परिस्तिथी पाहून आम्ही सोशल मीडियावर संदेश पाठवले होते. त्यातून आम्हाला प्रतिसाद मिळेल असे वाटत नसतांना शिर्डीतून ही पहिली मदत मिळाली. ही मदत स्वयंमच्या माध्यमातून गरुजूपर्यंत पोहचविली जाणार आहे. ही मदत आम्हा चिपळूनकरांना साईबाबांचा प्रसादच आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment