🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

लोकमान्य टिळक यांच्या पुण्य तिथीनिमित्ताने तसेच आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन करताना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक

श्रीरामपूर(वार्ताहर)-'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच', असा पण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि कामगारांच्या व्यथांना वाचा फोडणारे अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन करते असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले.
         नगरपरिषदेच्यावतीन लोकमान्य टिळक वाचनालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले. यावेळी  नगरसेवक रवी पाटील, मुख्तार शहा, प्रकाश ढोकने, कलीम कुरेशी,दिपक चव्हाण,ताराचंद रणदिवे, विजय शेळके,विजय खाजेकर ,विजय शेलार ,अलतमश पटेल, राजेंद्र पानसरे,रंजाक पठाण, नगरसेविका प्रणिती चव्हाण, जयश्री शेळके, अर्चना पानसरे, नयन गांधी, सोहेल शेख,हर्षल दांगट,  ग्रंथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते.
    लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना नगराध्यक्ष अनुराधा आदिक म्हणाले की, देशावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात देशवासियांना एकजूट करण्याचे, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरीत करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, हा विचार त्यांनी दिला. भारतीय स्वातंत्रलढ्याची आग धगधगती राहील याची काळजी घेतली.
      यावेळी नगराध्यक्ष आदिक म्हणले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. आपल्या लेखणी, शाहिरीवाणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राचा, गोवामुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सामान्य माणसापर्यंत नेले. दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांचा वास्तववादी जीवनसंघर्ष साहित्यातून जगासमोर आणले. शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवरच या जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी दिला. वास्तववादी, काळजाचा ठाव घेणाऱ्या अण्णा भाऊंच्या लेखणीनं, शाहिरीनं महाराष्ट्राचं साहित्यिक, सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केले.
लोकमान्य टिळक वाचनाल्यात टिळकाच्या पुतळ्यास व कर्मविर चौकात आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालुन अभिवांदन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.


श्रीरामपूर- नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्य तिथीनिमित्ताने तसेच आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन करताना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यावेळी नगरसेवक रवी पाटील, मुख्तार शहा, प्रकाश ढोकने, कलीम कुरेशी,दिपक चव्हाण,ताराचंद रणदिवे, विजय शेळके,विजय खाजेकर ,विजय शेलार ,अलतमश पटेल, राजेंद्र पानसरे,रंजाक पठाण, नगरसेविका प्रणिती चव्हाण, जयश्री शेळके, अर्चना पानसरे, नयन गांधी, सोहेल शेख,हर्षल दांगट,  ग्रंथपाल स्वाती पुरे   आदि  

No comments:

Post a Comment

Comments system