Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

मैत्री.....


मैत्री.....

 

मैत्री ही मुळात

करायची नसते

आयुष्याच्या वाटेवर 

ती सहज होत असते

 

सतत खळखळणाऱ्या

एखाद्या झऱ्याचे पाणी

अगदी तशीच असते

खऱ्या मैत्रीची कहाणी

 

मनेस्वभाव, विचार

एकदा का कळली

तेव्हापासून खरीखुरी

कायमची मैत्री जुळली

 

मित्राच्या आनंदात मित्र

अगदी सहज हसतो

दुःखाच्या प्रसंगात मात्र

अलगद अश्रू पुसतो

 

संकटाच्या काळात तो

न बोलावता येतो

काहीच न सांगता

दुःख समजून घेतो

 

 

आपल्या अडचणीच्या काळात

त्याचाही जीव लागत नाही

मित्राच्या सुखाशिवाय मित्र 

दुसरे काही मागत नाही

 

मोहाच्या क्षणात जेव्हा

आप चुकून बावरतो

खराखुरा मित्र तेव्हा

बरोबर सावरतो

 

 

कधी अटीतटीच्या प्रसंगात

सगळे साथ सोडतात

अशा आणीबाणीत मात्र

मित्रच बाहेर काढतात

 

मनात दाटलेल्या भावना

सहज मोकळ्या होतात

खऱ्या मित्रांच्या मैफिली

भरभरून आनंद देतात

 

सुखदुःख, राग, 

व्यक्त करता येतो

डोळ्यात बघून मित्र

वेदना समजून घेतो

 

                    ©®श्री. मयूर मधुकरराव जोशी

                    ग्रीन पार्कजिंतूर. जि. परभणी.

                     ☎️9767733560

                     ☎️7972344128


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात