श्रीरामपूर प्रतिनिधी:तालुक्यातील निपाणी वडगाव येथे सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र विरभद्र मंदिर परिसरात सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दि. ३१ ऑगस्ट रोजी कृष्णाजी महाराज मते यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. मंगळवार दि. २८ ऑगस्ट पासून लहानू महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सुरूवात झाली. सकाळी ७ ते ११ पारायण, दुपारी १ ते ३ भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, पहाटे ४ ते ६ काकडा भजन याप्रमाणे सर्व कार्यक्रम ठराविक लोकांच्या उपसथितीत उत्साहात संपन्न झाले. अशी माहिती राजा विरभद्र प्रतिष्ठाणचे प्रमुख विठ्ठल राऊत यांनी दिली.
काल्याच्या किर्तन प्रसंगी मते महाराज म्हणाले की, गेल्या १३ ते १४ वर्षांपासून निपाणी वाडगाव येथे अखंड हरिणाम सप्ताहाची परंपरा चालू ठेवून एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी सप्ताह कमिटी व राजा विरभद्र प्रतिष्ठाण यांना धन्यवाद देत महाराज म्हणाले की, दोन वर्षांसून कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले आहे. कोरानाची भिती न बाळगता सकस आहार व व्यायामाने निरोगी शरीर ठेवा. आणि परमेश्वराचे नामस्मरण करून आनंदी रहा. व शासनांच्या नियमांचे पालन करून भयमुक्त व्हा, असा उपदेश याप्रसंगी महाराजांनी केला. काल्याच्या किर्तनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताह काळात वीरभद्र महिला भजनी मंडळ व विरभद्र भजनी मंडळ तसेच विरभद्र पायी दिंडी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा शासनाचे नियम पाळून पार पडला.
याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सोपानराव राऊत, काशिनाथ गोराणे, भिमराज देवकर, जगन्नाथ गायधने, दत्तात्रय गोराणे, शरद देवकर, हौशिराम राऊत, विजय राऊत, संतोष राऊत, बापूसाहेब पवार, चांगदेव गोराणे, योगेश राऊत, मछिंद्र देवकर, पी. एम. राऊत, एम. के. राऊत, विष्णू राऊत, म्हाळसाकांत राऊत, संपत राऊत, पाटिलबा राऊत, रमेश राऊत, बाळासाहेब गायधने, राहुल राऊत, जगन्नाथ जाधव, नबाजी खाडे, लक्ष्मण राऊत, चंद्रकांत गोराणे, सुभाष काळे, आप्पासाहेब राऊत, तान्हाजी राऊत, रामभाऊ राऊत, शरद पवार, बापू गायधने, अजिंक्य पवार, विजय जेवरे, अशोक राऊत, सुनील नारळे, भाऊसाहेब वाघ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment