कार्यात कसूर करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची करा
छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांची मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी : इ-निविदा प्रक्रियेत कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारीयांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ई-निविदा प्रक्रियेत आपल्याकडे देण्यात आलेल्या तक्रारी संदर्भात ग्रामपंचयत विभागाकडून प्रस्तावित कारवाई बाबत देण्यात आलेल्या२७/०८/२०२१ च्या पत्रानुसार अनेक बीडीओ चौकशी करून दोषारोपपत्र पाठवले नाही,आपलं दि ३१/०३ /२०२१नोटीस नुसार जर खुलासा समक्ष सादर न केल्यासआपण वयक्तिक जबाबदार धरून आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व आपली)नियम१९७९ मधीलतरतुदी नुसार शिस्तभांग विषयक कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेश देऊन त्याचे पालन -कर्जत गटविकासअधिकारी,नेवासा -गटविकासअधिकारी,संगमनेर गटविकासअधिकारी'करत नाही यांचेवर आपल्या दि ३१/०३/२०२१च्या नोटीस नुसार कारवाई करावी
त्याच प्रमाणे श्रीरामपूर मधील टाकलीभान गावची तक्रार पुराव्यानिशी केली असताना तेथील गटविकासअधिकारी अनियमितता झाली नसले बाबत अहवाल पाठवतात आणि त्याची कोणतीही शहानिशा उपमुख्य कार्यकारीअधिकारी ग्रामपंचयत विभाग करतनाही तसेच विभागीय चौकशी सुरू असलयांवर कारवाई करण्यात दिरंगाई का कारण पुरावे आम्हि दिलेले आहेत पुन्हा आमची या निवेदनातून विनंती आहे की प्रस्तावित कारवाईसह प्रलंबित दोषारोप ठेवणाऱ्या कर्जत ,नेवासा,संगमनेर ,बीडीओ सह उपमुख्य कार्यकारीअधिकारी ग्रामपंचयत विभाग यांचेवर श्रीरामपूर बीडीओ च्या अहवालाची टाकलीभान गावची तक्रारीची शहानिशा न केल्या बाबत चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभांगची कारवाई करावी अन्यथा अखिलभारतीय छावा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर नितीन पाटील पटारे (जिल्हाध्यक्ष ), गणेश गायकवाड(जिल्हा सचिव) यांच्या सह्यात आहेत. निवेदनाच्या प्रति माहितीसाठी विभागीय आयुक्त नासिक विभाग नासिक् जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment