Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसह अखिलभारतीय छावा संघटना बैलगाडी मोर्चा काढणार असल्याचा इशारा


श्रीरामपूर :-अहमदनगर जिल्ह्यातील नगर,शेवगावपाथर्डी तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी सदृष्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना ५० हजार रूपये तातडीची मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीमागील आठवड्यात अहमदनगरजिल्ह्यातील नगर,शेवगावपाथर्डी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेकऱ्याने पशुधन वाहून गेले अनेक जनावरे मुतूमुखी पडलेतत्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दूध व्यवसाय वर आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ या अतिवृष्टीमुळे आली आहे काहींचे शेती कामाचे बैल वाहून गेले मृत पावले आशा सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने बैलजोडी घेण्यासाठी एकलाख पन्नासहजार रुपये मदत करावी,गाई साठी पन्नास हजार रुपये म्हैस साठी ऐंशी हजार रुपये  रोख स्वरूपात मदत मिळावी तरच पूरग्रस्त शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकेल त्याच प्रमामाने शेती चे जे नुकसान झाले ते पिका नुसार पंचनाम्या नुसार एकरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत करावी,

 तसेच ज्या व्यवसाईकांचे पुराचे पाणी दुकानात शिरल्याने नुकसानझाले त्यांना तातडीची मदत मिळावी

या सर्व प्रकारच्या मदतीचा प्रथम शेकऱ्यांनापशुधन खरेदीसाठी विशेषकरून बैलजोडी ,दुभती गाई,म्हैस खरेदीसाठी शासनाकडून रोख स्वरूपात मदत न मिळाल्यास शेवगाव नगर पाथर्डी येथील शेतकऱ्यांसह अखिलभारतीय छावा संघटना बैलगाडी मोर्चा  काढणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष) ,अमोल वाळुंज (ता कार्याध्यक्ष राहुरी)किशोर शिकारे(जिल्हा संपर्क प्रमुख)सचिन खंडागळे (वि आ जिल्हा प्रमुख),गणेश गायकवाड (जिल्हा सचिव)सुरेखाताई सांगळे पा (महिला जिल्हा अध्यक्ष)किरण फटांगरे(तालुका अध्यक्ष) आदींच्या सह्यात आहेत. 


WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात