🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने रज्जाक शेख सन्मानित





प्रतिनिधी =  पैलवान स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा अहमदनगर  यांच्यावतीने मिलन लॉन्स अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती श्रीरामपूर येथील शिक्षण विभागातील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक रज्जाकभाई शेख 
यांना "राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव" पुरस्काराने अहमदनगर पारनेर मतदार संघाचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या शुभहस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे,सिनेअभिनेते मोहिनीराज गटणे,प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, डॉ.प्रा.शैलेंद्र भणगे,पैलवान स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नानासाहेब डोंगरे  यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हयातील पुरस्कार्थी व प्रमुख पाहुणे  कोरोना प्रतिबंधक नियम पाळून उपस्थित होते. सद्याच्या काळात वेगवेगळ्या कोरोना जनजागृती संदर्भात शासकीय जबाबदारी घेऊन रज्जाक शेख यांनी काम पाहिले.परराज्यातील रेल्वेने येणारे व जाणारे प्रवासी तपासणी पथकात त्यांनी बेलापूर रेल्वेस्टेशन येथे नाईट ड्युटी बजावली.गरजवंत रुग्णाला अचानक रक्ताची गरज पडू शकते या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत दोनदा स्वतः रक्तदान केले. आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली.स्टडी एट होम ही संकल्पना राबवताना मुलांना दररोज व्हाट्सएपच्या माध्यमातून घरचा अभ्यास दिला.ज्या मुलांकडे मोबाईल उपलब्ध नाही त्यांना स्वाद्याय पुस्तिका झेरॉक्स करून घरोघरी जाऊन दिल्या आणि शिक्षण प्रक्रिया खंडित राहणार नाही याची दक्षता घेतली . मेसेजद्वारे ऑनलाईन टेस्ट ,ऑनलाईन अभ्यासाच्या पीडीएफ नित्यनेमाने पालकांपर्यंत पोहोचवल्या.शैक्षणिक विडिओच्या युट्युब लिंक, कवितांच्या लिंक व चित्र पाठवाचन लिंक ,स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांना दिल्या.कोरोना कालावधीत भर पावसाळ्यात शाळेत कोरोन्टाईन केलेल्या चाळीस मजुरांची तात्पुरत्या स्वरूपात पंधरा दिवसासाठी राहण्याची ,पाण्याची व विद्युत प्रकाशाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले. या कालावधीत शासनाकडून उपलब्ध शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तक  वाटपचे कार्य शंभर टक्के पूर्ण केले. तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात वाढती लोकसंख्या व त्याचे वातावरणातील ओझोनच्या थरावर होणारे परिणाम याविषयावर मॉडेल बनवून द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सक्रिय भूमिका असलेल्या श्रीरामपूर गटाने तृतीय क्रमांक मिळवला. राज्यातील विविध वृत्तपत्रातून "खेळू करू शिकू" या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.सध्या शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत 'काव्यदरबार' हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांतर्फे शैक्षणिक कविसंमेलनात काव्यसादरीकरणाची संधी मिळाली.ऑनलाइन विद्यार्थी स्वाध्याय ही संकल्पना अंमलबजावणी केली.राज्यभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या बालकविता व शेतीमातीच्या कविता प्रकाशित केल्या.जीवन गौरव परिवारातर्फे समाजातील मजूर,वंचित दुर्बल घटकातील,अल्पसंख्याक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरण केल्या. ह्या सर्व कार्याची दखल घेऊन पैलवान स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा अहमदनगर यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Comments system