🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटनेचा २५ ऑक्टोबरला बैलगाडी मोर्चा



श्रीरामपूर प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळेझालेल्या नुकसानीचे पंचनाम्यासाठी अधिकारी येईपर्यत खळे झाले तरी पंचनामा करावा ,तसेच आकटोम्बर महिन्यातील अवकाळी ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे आदेश देण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी छावा संघटनेच्यावतीने २५ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीन जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीजिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट -सप्टेंबरमहिन्यात अतिवृष्टी,ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानी,पीक नुकसान भरपाई साठी पंचनामे सुरू आहेत आपले तलाठीग्रामसेवक,कृषिसहयक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचू पर्यत काही शेतकऱ्यांनी पाण्यातुन  सोयाबीन सोंगुण खळे केले कारण सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते 


म्हणूनसोयाबीन ,बाजरी,उडीत,मूग,भुईमूग,मका खळे झालेले पंचनामे व्हावेत तसेच आकटोम्बर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून आवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेत. दि ०७/०९/२०२१ च्या पत्रा नुसार पाथर्डीशेवगाव,नगर तालुक्यातील पशुधन हानी साठी जिल्हापरिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखल देऊन सादर योजनेत प्राधान्याने पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी तसे पत्र जिल्हापरिषदेच्या मुखकार्यकारीअधिकारी यांना द्यावे. पंचनामे होऊन मदत मिळते किंवा नाही मिळत तोपर्यत सरकारी थकबाकी बैंक कर्ज वसुलीस,पाणीपट्टी,ग्रापंचयत थकबाकी,शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी. शासनाने एकरी५०हजार रुपये मदत घ्यावी. या सह इतर मागण्या साठी दि २५/१०/२०२१ रोजी आपल्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Comments system