आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण उत्तुंग व्यक्तित्वाला त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ,अनुराधा आदिक1या
श्रीरामपूर(वार्ताहर)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असो वा देशातील महत्त्वाची केंद्रीय मंत्रीपदे, चव्हाण साहेबांच्या कामगिरीतून त्यांचे जीवन व त्यांचे असामान्य कर्तुत्व ठसठशीतपणे अधोरेखीत झाले आहे. सामाजिक दृष्टिकोन, सुसंस्कृतपणा, संवेदनशीलता व साधेपणा या अंगभूत गुणांमुळे यशवंतराव चव्हाण प्रतिमेला लाभलेली झळाळी आजही कायम आहे. आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण उत्तुंग व्यक्तित्वाला त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करते असे नगराध्यक्ष अनुराधा आदिक.
नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयांच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्यचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पूजन केले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे,रवि पाटील,मुक्तहार शहा,शफीक शहा,कीलम कुरेशी, एस.के.खान,राजेद्र पानसरे,गोपाल वायदेशकर,अविनाश नागरे, निरजंन भोसले,सुनिल थोरात, लबडे सर, सागर गोरे,रज्जका पठाण,प्रदिप आहेर, प्रसन्न धुमाळ,ग्रथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाले,स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला दुरदृष्टी असलेला नेता लाभला. राजकीय जीवनातच नव्हे तर साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रातही त्याचे योगदान मोलाचे होते. हातात सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग न करता त्यांनी असंख्य योजना राज्यातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविल्य. देशाच्य राजकारणात उपपंतप्रधान, गृहमत्री, संरक्षण मंत्री महत्वाचे पदे यशस्वीरीत्या भूषवून महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर नेले. असा महान नेत्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन करते.
श्रीरामपूर-नगरपालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालय येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालनु अभिवांदन करताना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक ताराचंद रणदिवे,रवि पाटील,मुक्तहार शहा,शफीक शहा,कीलम कुरेशी, एस.के.खान,राजेद्र पानसरे,गोपाल वायदेशकर,अविनाश नागरे, निरजंन भोसले,सुनिल थोरात, लबडे सर, सागर गोरे,रज्जका पठाण,प्रदिप आहेर, प्रसन्न धुमाळ,ग्रथपाल स्वाती पुरे आदि.(छाया-अनिल पांडे)
No comments:
Post a Comment