पठाणी वीजबिल वसुली थांबवा अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल
पठाणी वीजबिल वसुली थांबवा अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल
छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांचा इशारा
श्रीरामपूर- महावितरणमार्फत नगरजिल्ह्यात सर्वच तालुक्यात विजबिल वसुलीसाठी विजतोडणी अभियान राबविण्यात येतआहे. कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता शेतीपपंची बेकायदेशी पणे वीज तोडून पठाणी वीजबिल वसुली केली जात आसहे. ही कारवाई थांबवावी अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप पीक वाया गेले, सरकारी भरपाई तुटपुंजी ती ही मिळाली नाही त्यात आपल्या कडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणारी विजबिलाची बेकायदेशीर पठाणी वसुली साठी चालू असलेली वीज तोड (वीजपुरवठा खंडित करणे)थांबवावी
दि25 अक्टोबर2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या कार्यलयावर अखिलभारतीय छावा संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढून वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती तसे पत्र आपल्याला जिल्हाधिकारी कार्यल्याकडून आले आहे तरी आता कांदा लागवडी आणि रब्बी हंगामात इतर पिकाच्या लागवडी चालू आहेत खरीप हातचा गेला रब्बी चे पीक आलेवर आम्ही बिल भरू शकतो तोपर्यंत आपली अडवणूक करून बेकायदा वीज तोडून चालू असलेली वसुली थांबवावी.
आमच्या विनंतीवरून आपण शेतकऱ्यांना प्रत्येक गावात एकत्र बोलून प्रत्यक्ष चर्चा करून वीजबिल वसुलीसाठी मार्ग काढावा वीज तोडणी हा मार्ग योग्य आणि कायदेशीर नाही आमच्याकडे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे,त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आपण तोडलेली वीज जोडणी करून द्यावी अन्यथा शुक्रवारी 3 डिसेंम्बर 2021रोजी आपल्या कार्यलयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष), निलेश बनकर पाटील(शेतकरी आघाडी प्रमुख), प्रवीण नाना देवकर (जिल्हा सरचिटणीस), शरद बोंबले (शहर अध्यक्ष), मनोज होंड(शहर उपाध्यक्ष), दादा बडाख (जिल्हा संघटक), विजय बडाख (तालुकाअध्यक्ष), प्रवीण लबडे (तालुका संघटक),अनिल जाधव, जयदीप काळे, संतोष जाधव, हरिभाऊ जाधव, संजय जगताप, हरिभाऊ राऊत, बाबासाहेब शेरकर, रामभाऊ सलालकर, भाऊसाहेब कचरे, रियाज पठाण, भीमराज राऊत,दिगंम्बर आरंगले आदींची नावे आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता महावितरण, अतिरिक्त पोलीस निरीक्षक, उपभयंता श्रीरामपूर ग्रामीण आदींना पाठविल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील हे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,अधीक्षकअभियंता काकडे साहेब ,प्रांत अधिकारी अनिल पवार साहेब यांची भेटघेऊन वीज तोडणी मुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास टॅनकर ने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली तसेच बैलगाडी मोर्चा काढला त्यावेळी मागणी केली होती विजबिलास स्थगिती मिळावि अन्यथा शेतकरी रोषास सामोरे असा इशारा देण्यात आला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा