श्रीरामपूर(वातार्हर)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या लोकशाही समाज व्यवस्थेत न्याय,समता,स्वातंत्र,बंधुता ही मुल्य प्रवर्धित करुन ही घटना डॉ.आंबेडकर यांनी जनतेप्रती अर्पण केली आहे. सर्व जाती, धर्म, भाषा ,पंथ यांना देशाचा एकमेव मार्गदर्शक ग्रंथआहे . भारतीय संविधान जगातला आदर्श राष्ट्रग्रंथ आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताईआदिक यांनी केले.
संविधान दिन व शहीद दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी करताना आमदार लहू कानडे ,नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, जेष्ठ नेते इंद्रभान थोरात,शशिकांत कडूस्कर सर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक मुक्तारभाई शहा,रवी पाटील, ताराचंद रणदिवे, प्रकाश ढोकणे, सोमनाथ गांगड,रईसभाई जहागिरदार,शफीभाई शहा,भैय्या भिसे, सागर भागवत, गोपाल वायनदेशकर, रज्जाकभाई पठाण, विजय खाजेकर,स्वाती पुरे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या भारतीय संविधान देशातील सर्वात लहान संस्था गाव पातळीवरील ग्रामपंचायत ते देशाची सर्वोच्च संस्था संसद ,न्यायपालिका ,प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला मार्गदर्शन करते .26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकार करून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा अंमलबजावणी करण्यात आली. सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ,न्याय ,स्वातंत्र्य ,बंधुता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क ,कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क ,कलम 23 ते 24 शोषणाविरुद्ध हक्क, कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क ,कलम 29 ते 31 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 32 ते 35 उपायोजनांचा हक्क या बाबी आहेत आपण सर्वांनी संविधान वाचावे ,भारतीय संविधानाचे प्रचारक व प्रसारक व्हावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मनोगत व्यक्त केले.
शाहीर दगडू नरवडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर पोवाडा गायला. रमादेवी धीवर यांनी संविधानाचे वाचन केले.
No comments:
Post a Comment