श्रीरामपूर- रस्त्यावर गती रोधक, वीज, पाणी, स्वच्छता अशा मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी शिरसगाव ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले आहे. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असून न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ॲड. बाबा शेख, ॲड. हारून बागवान, प्रदिपकुमार छल्लाणी, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रवी पंडीत, राज खान, हुसेन शेख, साजिद शेख, इम्रान शेख, हुसेन खाटिक, नदिम सय्यद, अलताफ, परवेज शेख आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम नुकतेच झाल्याने हरेगाव रोडवरील आझाद पोल्ट्रीफार्म जवळच्या एस कॉर्नर याठिकाणाहून वाहने भरधाव जातात. त्यामुळे परिसरातील अपघातांची संख्या वाढत आहे. शिवाय या भागात रात्री मोठ्या प्रमाणात अंधार असतो. परिसरातील लोकांना ये-जा करण्यासाठी मोठी गैरसोय यामुळे होते. शिवाय अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरट्यांचीही दशहत असते. या ठिकाणी पथ दिव्यांची खूप आवश्यकता आहे. याशिवाय परिसात घानीचे साम्राज्य असून कचराकुंडी बसविण्यात यावी. पिण्याचे पाणी अशुद्ध स्वरूपाचे येत असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना जल शुद्धीकरण यंत्रातील यावे अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर ॲड. बाबा शेख, ॲड. हारून बागवान, प्रदिपकुमार छल्लाणी, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रवी पंडीत, राज खान, हुसेन शेख, साजिद शेख, इम्रान शेख, हुसेन खाटिक, नदिम सय्यद, अलताफ, परवेज शेख, विशाल यादव, अन्सार शेख, मारूती गांगुर्डे, अस्लम शेख, नारायण छल्लाणी, सुमित जाधव, संतोष जाधव, विकास लोखंडे, प्रकाश हिवाळे, विश्वास गायकवाड, बाळू म्हसे, सुनील सोनवणे, अंकूश जगताप, चंदाबाई गांगुर्डे, शिवाजी वाघमारे, वसंत गायकवाड, अमोल शिंदे आदींच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment