Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

मयुर जोशी यांच्या 'आसवांची स्पंदने' या कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान......


मयुर जोशी यांच्या 'आसवांची स्पंदने' या कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान...... 


जिंतूर जि परभणी येथील रहिवासी असणारे आणि मागील दोन वर्षापासून अनेक वर्तमान पत्रातून अत्यंत प्रेरणादायी, भावस्पर्शी, आणि जबरदस्त लेखांचे, तसेच कथा व कवितांचे लेखन करणारे साहित्य क्षेत्रातील नवोदित परंतु अत्यंत प्रतिभासंपन्न लेखक तथा कवी  मयूर मधुकरराव जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर येथील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार त्यांच्या 'आसवांची स्पंदने' या कथासंग्रहासाठी समारंभपूर्वक आणि सहकुटुंब प्रदान करण्यात आला. या कथासंग्रहासह मयुर जोशी यांची 'भावस्पर्शी मयूरविचार' (ललितगद्य संग्रह), 'यथार्थ' (कवितासंग्रह) अशी एकूण तीन पुस्तके प्रकाशित आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा 'संविधान दिनाचे' औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2021 रोजी डॉ. भालचंद्र ब्लड बँक लातूर येथील भव्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर द्वारा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे अध्यक्ष ॲड. एस. एन बोडके, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ नागोराव कुंभार तसेच माय मराठी भाषेची सेवा करणाऱ्या अनेक साहित्यिकांची उपस्थिती लाभली.
WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात