🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर खर्डा-भाकरी आंदोलन


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर खर्डा-भाकरी आंदोलन

जिल्हाध्यक्ष पटारे यांच्या नेतृत्वाखाली छावाचे आंदोलन

मंत्री थोरातांचे आंदोलकांना आश्वासान

श्रीरामपूर-अतिवृष्टीमुळे झालेल्या हानी झालेल्यानुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, या मागणीसाठी आज दिवाळीच्या दिवशी छावा संघटनेच्यावतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी खर्डा भाकर आंदोलन करण्यात आले. मंत्री थोरात यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारून नुकसान भरपाई लवकरात लवकर वर्ग कऱण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

श्रीरामपूर व बेलापूर येथील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांच्या यादीत सामाविष्ट करण्यासाठी येणाऱ्यात तांत्रीक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचना करणार असल्याचेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.


जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढल्यानंतरही शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाऊले न उचलल्याने आज हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पटारे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात( नगरपाथर्डीशेवगावतालुक्यातील ) अतिवृष्टीढगफुटीसदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानीपीक नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत. तलाठी,ग्रामसेवककृषिसहयक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचूपर्यत  काही शेतकऱ्यांनी पाण्यातून सोयाबीन सोंगुण खळे केले. कारण सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते.  सोयाबीन,बाजरी,उडीत,मूग,भुईमूग,मका खळे झालेले पंचनामे व्हावेततसेच   आकटोम्बर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून आवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेत.  दि ०७/०९/२०२१ च्या पत्रानुसार पाथर्डी,शेवगावनगर तालुक्यातील पशुधन हानी साठी जिल्हापरिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसेच सदर योजनेत प्राधान्याने पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी तसे पत्र जिल्हापरिषदेच्या मुखकार्यकारीअधिकारी यांना द्यावेत.  पंचनामे होऊन मदत मिळते किंवा नाही मिळत तोपर्यत सरकारी थकबाकी बैंक कर्ज वसुलीस,पाणीपट्टी,ग्रापंचयत थकबाकी,शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी. शासनाने एकरी ५० हजार रुपये मदत घ्यावी.  पीकविमा १०० टक्के मंजूर करावा. यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ५/१०/२०२१ रोजी  अखिलभारतीय छावा संघटनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा नेण्यात आला  होता.मात्र तरीही शासनास जाग आली नाही. या मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास यापेक्षाही अधिक तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


निवेदनावर नितीन पाटील पटारे (जिल्हा अध्यक्ष)अविनाश सातपुते पाटील(जिल्हा उपाध्यक्ष)निलेश बनकर पाटील(शेतकरी आघाडी प्रमुख)दादा बडाख पाटील(जिल्हा संघटक) आदींच्या सह्यात आहेत.आंदोलनात नितीन पटारे,जिल्हाउपाध्यक्ष अविनाश सातपुते,जिल्हा संघटक दादा बडाखशेतकरी आघाडीचे निलेश बनकजि संपर्क प्रमुख अनिल तळोलेसुहास निर्मल,एकलव्य चे सुभाष मोरेशाखा अध्यक्ष सोमनाथ तळोले,नामदेव झडे आदींनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Comments system