एसटी कामगारांचा श्रीरामपूरात मोर्चा
श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी श्रीरामपूर संयुक्त कृति समितीच्या वतीने मुदत धरणे आंदोलन सुरू केलेले होते. परंतु सरकारने सदरच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी उपोषणाचे रुपांतर मोर्चात केले. शहरातील श्रीरामपूर आगार पासून मोर्चाला सुरुवात होऊन मेनरोड- शिवाजी रोड मार्गे महात्मा गांधी पुतळ्या जवळ सदर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
शासनाच्या नाकर्तेपणामुळे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. त्या मुळे कामगार, कष्टकरी व सर्व सामान्य जनतेचे जीवनमान खालावले आहे. वेगवेगळ्या उद्योगामध्ये अनेक ठिकाणी जागतिक रोगराईचे(कोरोना)कारण देवून संघटीत असणाऱ्या कामगार वर्गाची पिळवणूक करून त्यांना कोणतेही कारण न देता नोकरीतून बडतर्फ केले गेले तसेच कोरोना काळातील वेतन देखील देण्यात आलेले नाही. अनेक कष्टकरी कामगार हे वेगवेगळ्या सेवा देत असताना कामगार मृत्यु मुखी पडलेले आहेत. अशा कामगारांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर करून ही ते देण्यात आलेले नाही. राष्ट्रीय परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासनाच्याना इतर विभागाच्या तुलनेत सर्वात कमी तुटपुंजे वेतन देवून एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय केला गेला आहे. एस टी महामंडळातील कामगारांना महामंडळ सध्या देत असलेल्या पगारातून त्यांच्या नित्याच्या मूलभूत गरजा सुध्दा भागविणे कठीण झाले आहे. मुलाबाळांचा खर्च सुध्दा ते या पगारातून करु शकत नाही हेएस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एसटी महामंडळातील अनेक कामगार कर्मचाऱ्यांनी मुलांचे शिक्षण घरदार बांधणे वगैरे बाबत वेगवेगळ्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले आहे त्यामुळे जवळपास ९०% कामगार कर्मचारी हे कर्जाच्या बोज्याखाली दाबले गेलेले आहेत. तुटपुंजी पगार वगैरे बाबत या कामगारांमध्ये असंतोष निर्माण होवून महाराष्ट्रात जवळपास ३५ कामगारांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊले उचलली आहेत. शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हा आकडा आणखी वाढण्याची सध्या भिती निर्माण झालेली आहे. या कर्मचाऱ्यांना जाहीर सक्रीय पाठिंबा देण्यासाठी दिनांक शनिवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाच्याचे माहात्म्य गांधी पुतळ्या मेनरोड येथे जाहीर सभेत रुपांतर झाले या वेळी कामगार नेते नागेश सावंत, भाजपाचे प्रकाश चित्ते, तृतीयपंथीयांच्या नेत्या दिशा पिंकी शेख, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड जीवन सुरुडे, मनसेचे बाबा शिंदे, छावाचे नितीन पठारे, बहुजन वंचितचे चरण त्रिभुवन, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, देवीदास काहाणे, विष्णू गर्जे, सुरेश चांदणे, प्रशांत लीहीणार, मुन्ना शेख, अमोल पठारे, गणेश पुजारी, उमाताई बर्डे, कु.ताहेरा तांबोळी आदिंची भाषणे झाली. यावेळी अनेकांनी कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त करून शासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी एसटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सौ.ज्योती गुंजाळ यांना एसटी कामगारांचे लहान मुलांच्या हस्ते देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी
ताराचंद अलगुड्डे, नजीर शेख, जर्नादन भवर, सुनील इंगळे, सलीम शेख, नगरसेवक किरण लुणे, संजय पांडे, या आंदोलनास आ.लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, आर पी आयचे विजय पवार,भाजपाचे मारुती बिंगले, हिंदू एकताचे सुदर्शन शितोळे, भीम शक्तीचे संदीप मगर, संघर्ष समिती चे अशोक राऊत, भारतीय लहुजी सेनेचे हानीफ पठाण, आम आदमी पार्टिचे तिलक डुंगरवाल आदि उपस्थित होते. मोर्चाच्या वेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. संजय सानप यांच्या उपस्थिती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment